Pune News : बहार’ मैफलीद्वारे उलगडल्या ‘वसंता’तील स्वर-रंगछटा

ब्य्रू अँड बझ ग्लोबल आयोजित मैफलीत डॉ. कौस्तुभ गांगुली यांचे शास्त्रीय-उपशास्त्रीय गायन

एमपीसी न्यूज- ‘प्रभु रंग भिना मोहे सब सुख दिना‘, ‘डार डार पाथ पाथ पपिहा बोले‘, ‘का संग खेलू मै फागशाम नाही आये आँगन मे‘ अशा बंदिशींमधून वसंत ऋतूच्या स्वर-रंगछटा ‘बहार‘ मैफलीद्वारे (Pune News) उलगडल्या; निमित्त होते ब्य्रू अँड बझ ग्लोबल आयोजित डॉ. कौस्तुभ गांगुली यांच्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन मैफलीचे.

कॅफे हाऊस रीकापौड रोड येथील खुल्या जागेत या ‘बहार‘ मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. पटियाला घराण्याची तालिम घेतलेले डॉ. कौस्तुभ गांगुली यांना मिलिंद कुलकर्णी (संवादिनी) आणि पांडुरंग पवार (तबला) साथसंगत केली. डॉ. गांगुली हे पंडित अजय चक्रवर्ती यांचे शिष्य आहेत.

Digestion and the Five Principles : अन्नपचन आणि पाच  तत्त्वे. 

डॉ. गांगुली यांनी आपल्या मैफलीची सुरुवात भूपाली रागातील बंदिशीने केली. त्यानंतर तराना सादर केला. ग्यानप्रकाश भोज यांची हिंडोल रागातील बंदिश रसिकांना सुखवून गेली तर श्रीकृष्ण न आल्यामुळे होळी कशी खेळणार अशा विचारांनी भावविभोर झालेल्या गोपिकांची मनोवस्था ‘का संग खेलू मै फागशाम नाही आये आँगन मे‘ या ठुमरीद्वारे प्रभावीपणे मांडली. त्यानंतर ‘रंग न डारो शामजी‘ ही रचना सादर करून भैरवीतील ‘बाजे मुरलीया बाजे‘ या प्रसिद्ध भजनाने मैफलीची सांगता करत रसिकांना सुरांची अनोखी सफर घडविली.

अध्यात्माचे अधिष्ठान असलेले अभिजात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ऐकणारा उत्तम श्रोतृवर्ग निर्माण व्हावाकलाकाराची कला रसिक श्रोत्यांनी आपल्या तनामनात उतरवून त्यात संपूर्ण तल्लीन होऊन एका वेगळ्या आनंदाची अनुभूती घ्यावी यासाठी ब्य्रू अँड बझ ग्लोबलतर्फे ‘बहार‘ या मैफलीचे आयोजन करण्यात आले.

तसेच संगीत मैफलीच्या माध्यमातून रसिकांनी एका अनोख्या अनुभूतीविश्वाची प्रचिती घ्यावी यासाठी वैविध्यपूर्ण मैफलींचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती प्रयोगशील युवा व्यावसायिक आणि उत्तम तबलावादक मोहनीश जाजू यांनी प्रास्ताविकात दिली.  विविध कलांवर प्रेम असल्याने रसिकांसाठी वैशिष्ठ्यपूर्ण मैफलींचे नियमित आयोजन केले जाईलअशी माहिती सर्वेश जाधव यांनी या प्रसंगी दिली.

प्रसिद्ध तबलावादक पंडित अरविंदकुमार आझादसतार वादक शाकिर खाँगायिका मंजुश्री ओक यांच्यासह गायन-वादन क्षेत्रातील ज्येष्ठ तसेच युवा कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. कलाकारांचा सत्कार मंजुश्री ओकप्रसिद्ध शेफ सर्वेश जाधव (Pune News) यांनी केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.