Pimpri : गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक झाला कमी

पोलिसात तक्रार दिल्याने खंजीरने केले वार

एमपीसी न्यूज – पोलिसात तक्रार दिल्याने दोघांनी मिळून एका दोघा भावांना (Pimpri )जीवे मारण्याचा प्रयत्न केला. एकाला खंजीरने मारून गंभीर जखमी केले. जीवे मारण्याच्या भीतीने तरुण भर उन्हात रस्त्याने सैरावैरा पळत होता. यामुळे पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाला असल्याचे दिसत आहे. ही घटना बुधवारी (दि.5) दुपारी तीन वाजताच्या सुमारास विठ्ठलनगर नेहरूनगर पिंपरी येथे घडली.

रोहन हनुमंत पवार, साहिल हनुमंत पवार (वय 25, दोघे रा. पिंपरी) अशी जखमींची नावे आहेत. साहिल यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभी गायकवाड (वय 22), मॉन्टी वाल्मिकी (वय 23, दोघे रा. नेहरूनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari News : दरवाजा लॉक न करता फिरायला जाणे पडले महागात, घरातून लॅपटॉप व मोबाईल चोरीला

एक महिन्यापूर्वी फिर्यादी साहिल यांचा लहान भाऊ रोहन यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात मारहाण प्रकरणी अदखलपात्र तक्रार दिली होती. त्याचा राग अभि गायकवाड याच्या मनात होता. बुधवारी दुपारी साहिल हे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी अभि याने त्यांना अडवून त्यांच्या दुचाकीची चावी काढून घेतली. तुझ्या भावाने पोलिसात तक्रार दिली होती, त्याला बोलावून घे म्हणत धमकी दिली.

साहिल यांनी लहान भाऊ रोहन यांना विठ्ठलनगर येथे बोलावून घेतले. त्यावेळी आरोपी अभि आणि त्याचा मित्र मॉन्टी या दोघांनी खंजीर काढला. हे पाहून रोहन तिथून टेल्को रोडच्या दिशेने पळून गेला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना खंजीरने मारून गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत फिर्यादी आरोपींच्या भीतीने त्यांच्या तावडीतून सुटून भर उन्हात रस्त्याने सैरावैरा पळत सुटले. त्यांच्यवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गुन्हा घडून दोन दिवस उलटले तरी पोलिसांना आरोपींचा शोध लागलेला नाही. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

गुन्हेगारांवरील वचक कमी होतोय

भर दिवसा अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाला असल्याचेही दिसत आहे. एखाद्या प्रकरणात तक्रार दिलेल्या फिर्यादीच्या जीवाला धोका असतो, हे जाणून देखील (Pimpri ) फिर्यादींना सुरक्षा पुरविण्यात पोलीस कमी पडत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.