Bhosari News : दरवाजा लॉक न करता फिरायला जाणे पडले महागात, घरातून लॅपटॉप व मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज –  मर्निंगवॉकला जाताना घराचा (Bhosari News) दरवाजा लॉक न करता जाणे एका नागरिकांला चांगलेच महागात पडले आहे. कारण सकाली साडे सात ते आठ केवळ या अर्ध्यातासात घरातून लॅपटॉप व मोबाईल चोरीला गेला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.6) भोसरी येथे घडली आहे.

महिलेने दिलेल्या फिर्यादिनुसार, भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC : अधिकारी, कर्मचा-यांनो मालमत्तेची माहिती सादर करा, अन्यथा…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घरातून निघाल्या, मात्र त्यांनी  घराचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवला. यावेळी चोरट्यांनी घरात प्रवेश करत फिर्यादी यांच्या मुलाचे 42 हजार रुपयांचे दोन लॅपटॉप व मोबाईल असा एवज चोरून नेला आहे. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Bhosari News) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.