IPL 2023 : केकेआरने आरसीबी विरुद्ध जिंकला एकतर्फी सामना

एमपीसी न्यूज – गुरुवार 6 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यामध्ये केकेआरने (IPL 2023) आरसीबी ला 81 धावांनी हरवले. केकेआर ने हा सामना एक तर्फा जिंकला आणि आरसीबी ला कुठेही सामन्यामध्ये स्वतःचा वचक मांडण्याची संधी दिली नाही. ईडन गार्डन्स वर झालेल्या या सामन्यामध्ये केकेआर चे समर्थक मोठ्या प्रमाणात आले होते. स्वतःच्या घरेलु मैदानावर आयपीएल 2023 मधला पहिला सामना जिंकून केकेआरने स्वतःच्या समर्थकांसमोर जिंकला. नाणेफेक जिंकून आरसीबी ने गोलंदाजी निवडली परंतु तो निर्णय त्यांचा विरोधात गेला.

 

पहिली फलंदाजी करताना कोलकाता ने स्वतःचा सलामी फलंदाज व्यंकटेश (3) अय्यर लवकर गमावला. मनदीप सिंग (0) आणि कर्णधार नितीश राणा (1) हे ही स्वस्तात उडाले. त्यानंतर अफगाणिस्तानचा रहमानउल्ला गुरबाज आणि रिंकू सिंग यांनी कोलकाताची पारी सांभाळली. रहमानउल्ला गुरबाजने 44 चेंडूंमध्ये 57 धावा काढल्या तर रिंकू सिंगने 33 चेंडूंमध्ये 46 धावा काढल्या. बिग हिटर आंद्रे रसल घरी ईडन गार्डनच्या या मैदानावर अपयशी ठरला असेल त्याची कमतरता शार्दुल ठाकुर ने जाणून दिली नाही. शार्दुल ठाकुर ने 29 चेंडू मध्ये 68 धावा काढल्या. आरसीबी कडून डेव्हिड विली आणि करण शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. मोहम्मद सिराज, मायकल ब्रेसवेल आणि हर्षल पटेल या गोलंदाजाने प्रत्येकी एक बळी घेतला. केकेआर ने आरसीबी समोर 205 धावांचे विशाल लक्ष ठेवले.

विशाल धावसंख्याचा पाठलाग करताना आरसीबीने सुरुवातीला शस्त्र टाकून दिले. फाफ डुप्लेसिस (23) आणि विराट कोहलीने (21) आरसीबी ला संतुलित सुरुवात दिली. परंतु ते दोघे काही दीर्घकाळ टिकले नाहीत आणि बाद झाले. त्याच्यानंतर आरसीबीचा कुठलाच फलंदाज जास्त वेळ टिकला नाही व त्यांची पडती लागली. आरसीबी 123 चा धावसंख्या वरती पूर्णपणे बाद झाली आणि हा सामना 81 धावांनी हरली. केकेआर कडून गोलंदाजी करताना वरून चक्रवर्तीने चार बळी घेतले तर इम्पॅक्ट प्लेयर सुयश शर्मा ने तीन बळी घेतले. सुनील नरेन ने दोन बळी घेतले तर शार्दुल ठाकुर ने एक बळी घेतला. कोलकाता हा सामना अगदीच निवांतपणे जिंकली.
मागील वर्षांप्रमाणेच आरसीबी चे काही प्रमुख फलंदाज जर चालले नाहीत तर पूर्ण संघ डगमगतो हा त्यांचा इतिहास राहिला आहे. आरसीबी कडे विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार डुप्लेसेस नंतर येणारा सक्षम फलंदाज दिसून येत नाही म्हणून त्यांना (IPL 2023) यंदाच्या आयपीएलमध्ये बऱ्याच परीक्षांना सामोरे जावे लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.