Corona News : राज्य सरकारमधील मंत्री, सहकारी मास्क वापरताना दिसत नाही – अजित पवार

एमपीसी न्यूज : राज्य सरकारमधील मंत्री आणि अन्य सहकारी (Corona News) मंडळी मास्क वापरताना दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांना कोरोनाचे एवढे काही गांभीर्य वाटत नाही. त्यामुळे सध्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी कोरोनाबाबत लवकर भूमिका मांडावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडली.

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून अशीच परिस्थिती राज्यात देखील आहे.त्यावर राज्य सरकारकडून देखील कोणत्याही प्रकारची भूमिका मांडली जात नाही. त्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भूमिका मांडली.

यावेळी अजित पवार म्हणाले, कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याकडे आपण सर्वजण गांभीर्याने पाहत नसून त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

सरकारी यंत्रणेमध्ये काम करणार्‍या व्यक्तींनी तसेच त्या ठिकाणी कामानिमित्त जाणार्‍या नागरिकांनी मास्क घालूनच गेले पाहिजे. मात्र अद्यापपर्यंत आदेश काढले गेले नाहीत.

IPL 2023 : केकेआरने आरसीबी विरुद्ध जिंकला एकतर्फी सामना

तसेच राज्य सरकारमधील मंत्री आणि (Corona News) अन्य सहकारी मंडळी मास्क वापरताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांना कोरोनाच एवढ काही गांभीर्य वाटत नाही.

 रुग्णांची सध्याची परिस्थिती नागरिकांना समजण्यास मदत होईल अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.