Dighi : बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेले चार लाखांचे मांडूळ जप्त; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीररित्या विक्रीसाठी आणलेले चार लाख रुपये किमतीचे मांडूळ एमआयडीसी भोसरी पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई पुणे-नाशिक रस्त्यावर मोशी येथे करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

हेमंत संजू पवार (रा. शिवाजीनगर), आकाश बापू वाघमारे (रा. बीटी कवडे रोड, भीमनगर, झोपडपट्टी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अभय महादेव भवारी (वय 38, रा. किरकीटवाडी, खडकवासला) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे नाशिक रस्त्यावर मोशी येथे काळजे पेट्रोल पंपाजवळ दोन व्यक्ती मांडूळ विक्रीसाठी आल्याचे एमआयडीसी भोसरी पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याजवळ तीन फूट लांब आणि अडीच किलो वजन असलेले एक मांडूळ आढळून आले. यावरून दोघांना अटक करून प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.