Pune News : बिर्याणीवरून पुण्यात पुन्हा एकदा वाद, हॉटेल चालकाला टोळक्याने बदडले

एमपीसी न्यूज : काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या बिर्याणी प्रकरणाचा वाद संपतो न संपतो तोच याच बिर्याणी वरून पुन्हा एकदा वाद झाला आहे. एका टोळक्याने हॉटेल चालकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार धायरी येथील गणेशनगर भागात घडला आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीसांत मयूर मते (वय ३३) यांनी तक्रार दिली आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर मते यांचे गारवा बिर्याणी हॉटेल आहे. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दोघेजण त्यांच्याकडे बिर्याणी खाण्यासाठी आले होते. त्यावेळी किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाले. वादाचे रूपांतर बाचाबाचीत झाले. त्याचा राग आल्याने संबंधिताने त्याच्या साथीदारांना बोलावून घेतले.या टोळक्याने हातात घातक हत्यारे घेऊन हॉटेलात प्रवेश केला. तसेच, शिवीगाळ करत मयूर यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, कामगार इसराफील मध्ये आल्याने यात तो जखमी झाला.

पुन्हा त्यांना मारण्यासाठी एकाने लोखंडी रॉडने त्यांच्यावर वार केला. यात ते जखमी झाले. तर, हॉटेलमधील बिर्याणीचे पातेले, झाकणे, खुच्र्या कामगारांना फेकून मारत जखमी केले. या गोंधळामुळे गर्दी जमा झाली. त्या नागरिकांना देखील या टोळक्याने शिवीगाळ केली. तर, परिसरात दहशत पसरविली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक खेडकर करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.