Pune News : ‘सूर्यदत्त’च्या दिया नितीन पाटीलने जिंकला ‘फॅशन मॉडेल ऑफ द वर्ल्ड’चा किताब

एमपीसी न्यूज : व्हिवज फॅशन स्कूल आयोजित इंटरनॅशनल किड्स, टीन्स फॅशन रनवे दुबई शोमध्ये सूर्यदत्त नॅशनल स्कुलच्या दिया नितीन पाटील हिने (Pune News) ‘फॅशन मॉडेल ऑफ द वर्ल्ड’ हा किताब जिंकला. भारत, दुबई, मिलान, न्यूयॉर्क आणि लंडन येथे ही स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत विविध देशातील मुला मुलींचा समावेश होता.

दिया सूर्यदत्त नॅशनल स्कूलमध्ये इयत्ता 7 वी मध्ये शिकते. तिने राष्ट्रीय पोशाख फेरी आणि रॅम्प वॉक परिचय फेरी सादर केली. ती ‘इंटरनॅशनल फॅशन रनवे शो’ची उपविजेती, तर ‘इंटरनॅशनल फॅशन रनवे टॅलेंट राऊंड’ची विजेती ठरली. ‘फॅशन मॉडेल ऑफ द वर्ल्ड’चा किताब जिंकला. तिच्या या यशाबद्दल तिला ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

“मुलांचा विकास, त्याचा मेंदू, वातावरण आणि कुटुंब, मित्र आणि शिक्षक यांच्यासोबतचा अनुभव यावरून घडते. माझ्या मुलीला रॅम्प वाक करताना पाहिले आणि तिचा मॉडेलिंगकडे असलेला कल पाहिला, तेव्हा  तिला वयाच्या 8 व्या वर्षी विविध फॅशन शोमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही प्रोत्साहन दिले. तिने तिच्या स्टेज परफॉर्मन्सचा अनुभव घ्यायला सुरुवात केली आणि त्यानुसार तिचा विकास होऊ लागला. तिचे  आंतरराष्ट्रीय स्तरावरील यश पाहून आनंद झाला आहे. सूर्यदत्त नॅशनल स्कूल, कुटुंबीय आणि शिक्षकांचे आभार मानते,” असे दिया पाटीलची आई राजश्री पाटील यांनी सांगितले.

Pune RTO : नागरिकांना रॅपीडो अॅपचा वापर करू नका; RTO चे आवाहन

सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी दियाच्या उज्वल यशाबद्दल अभिनंदन केले आणि शुभेच्छा व्यक्त केल्या.(Pune News) सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, प्राचार्या शीला ओक यांच्यासह तिच्या शिक्षकांनी, सहकारी विद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन केले.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “पुस्तकी ज्ञानाबरोबरच सूर्यदत्त शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाचे, कलागुणांचे शिक्षण दिले जाते. त्यांचे छंद, आवडी जोपासण्याला प्रोत्साहन देण्यात येते. सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मुलामुलींना या क्षेत्रात करिअर करण्याची संधी दिली जाते. दियाने मिळवलेले यश संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.