Kartiki Yatra: ज्ञानेश्वर माऊली नूतन मुखप्रतिमा अर्पण सोहळा व सहस्त्र कुंभ जलाभिषेक सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज :- संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज सोहळा व कार्तिकी यात्रेचे औचित्य साधत श्री ज्ञानेश्वर माऊलींची नूतन चांदीची मुखप्रतिमा माऊली भक्तांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान माऊली मंदिरात अर्पण केली. यावेळी सहस्त्र जलकुंभाचे पूजन करून त्या जलकुंभातील पाण्याद्वारे नूतन चांदीच्या माऊली मुखप्रतिमेला जलाभिषेक करण्यात आला. जलकुंभात नर्मदा, गंगा, इंद्रायणीचे जल होते. यावेळी देवस्थान प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विकास ढगे पाटील, देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, माऊलींचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे, योगेश आरू व माऊली भक्त उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.