Maharashtra News : परदेशात पीएचडी करायची! मग शासनाच्या योजनेतून मिळवा शिष्यवृत्ती

एमपीसी न्यूज – पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमासाठी (पीएचडी) सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित (Maharashtra News) जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्तीसाठी 20 जून 2023 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Ashadhi Wari 2023 : वारकऱ्यांसाठी प्रशासन सज्ज; उष्माघाताचा त्रास होऊन नये म्हणून खबरदारी

समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “महाराष्ट्र (Maharashtra News) शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील राज्यातील 75 विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.

पदव्युत्तर पदवी आणि पीएचडीसाठी क्यूएस जागतिक रँकिंग 300 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.

विद्यार्थ्यांने विहीत नमुन्यातील अर्ज राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील रोजगार लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावा. परिपूर्ण अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह समाज कल्याण आयुक्तालय 3, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे 1 या पत्त्यावर विहित मुदतीत पाठवावा.

या योजनेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्ष व पीएचडीसाठी 40 वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील एमडी व एमएस अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील.

अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट देऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन नारनवरे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.