Pune : वारजे वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल

एमपीसी न्यूज – वारजे वाहतूक विभागाच्या (Pune) हद्दीत कै. जनार्दन पाटलु चौधरी उद्यान लगतच्या महावितरण मेन डीपी पर्यंत सुमारे 35 मीटर पर्यंत नो-पार्किंग करण्यात येत आहे. हा बदल प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आला आहे.

Ashadhi Wari 2023 : वारकऱ्यांसाठी प्रशासन सज्ज; उष्माघाताचा त्रास होऊन नये म्हणून खबरदारी

पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी याबाबत आदेश दिले आहेत. अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे आदेश लागू नसतील. या तात्पुरत्या आदेशाबाबत नागरिकांनी आपल्या सूचना असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक 6, येरवडा टपाल कचेरीजवळ, पुणे 6 येथे 4 जून पर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.