Ashadhi Wari 2023 : वारकऱ्यांसाठी प्रशासन सज्ज; उष्माघाताचा त्रास होऊन नये म्हणून खबरदारी

एमपीसी न्यूज : यंदाची एकादशी वारी ही पावसाआधीच (Ashadhi Wari 2023) सुरू होणार असल्याने भाविकांना उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठीच पुरेशी औषधे व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखीसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पालखी मार्ग, पालखी तळ आणि विसाव्याच्या ठिकाणी भेट दिली. पालखी मार्गावर आरोग्य सुविधा, फिरते शौचालय, पाणी, वीज आदी सर्व सुविधा प्राधान्याने पुरविल्या जातील.

Talwade : धोकादायक वीजवाहिन्या होणार भूमिगत; गणेशनगर- ज्योतिबानगरमध्ये कामाला सुरूवात

पालखी मार्गावरील विश्रांतीच्या ठिकाणी आणि मुक्कामाच्या ठिकाणी अतिरिक्त राखीव पंप ठेवण्यात येणार आहेत. तसेच टँकरच्या संख्येतही वाढ करण्यात येणार आहे. याशिवाय पालखी मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या ठेवण्यात येणार आहेत.

कर्‍हा नदीवरील पुलाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले (Ashadhi Wari 2023) असून या पुलावरून पालखी जाणार असल्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नीरा नदीवरील पुलाच्या संरक्षक भिंतींची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.