Talegaon News : जागतिक डॉक्टर दिनाच्या निमित्ताने आरोग्य केंद्रातील डाॅक्टरांचा सन्मान

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील सत्तारूढ नगरसेवकांच्या वतीने जागतिक डॉक्टर दिनाच्या निमित्ताने तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, नगरसेवक अमोल शेटे, संतोष दाभाडे पाटील, नगरसेविका शोभा भेगडे, मंगल जाधव, प्राची हेंद्रे, काजल गटे, सचिन जाधव, गणेशआप्पा भेगडे, सतीश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी डाॅ. प्रशांत आगलावे  डाॅ. नेहा माथवर, डाॅ फोले यांना पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष जगनाडे म्हणाल्या कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तळेगावकर नागरिकांची सेवा केली. लसीकरणाचे काम शासनाच्या प्राप्त लसी कोठ्या प्रमाणे चालू ठेवले. व यापुढे देखील करण्याची उमेद दर्शवली.

त्याबद्दल सर्व डॉक्टर्स,नर्सेस, आया,आशा सेविका यांचे मी तळेगावकरांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करते व भविष्य काळामध्ये अशा प्रकारेच तळेगावकरांची सेवा घडावी. अशी अपेक्षा करते. प्रास्ताविक संतोष दाभाडे पाटील यांनी केले. आभार अमोल शेटे यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.