Hinjawadi news : अखेर बरणीत तोंड अडकलेल्या ‘त्या’ कुत्र्याची तीन दिवसांनी सुटका

एमपीसी न्यूज : प्लास्टिकच्या बरणीत तीन दिवसांपासून अडकलेले (Hinjawadi news) एका गावठी कुत्र्याचे तोंड बरणीतून काढून प्राणी मित्रांनी अखेर त्याची सुटका केली आहे.

याबाबत वाईल्ड एनिमल्स अँड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीचे गणेश भुतकर म्हणाले की, आज दुपारी वाईल्ड एनिमल्स अँड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीचे शेखर जांभुळकर यांना हिंजवडीचे ग्रामस्थ अरुण साखरे यांचा फोन आला होता. फोनवर अशी माहिती मिळाली की सुमारे तीन दिवसांपासून एका गावठी कुत्र्याचे तोंड प्लास्टिकच्या बरणीत अडकले आहे. त्यांनी विचारले की आपल्याकडून काही उपाय करता येईल का?

शेखर जांभूळकर यांनी संस्थेची कार्यकारी अधिकारी गणेश भुतकर आणि किरण जांभुळकर यांना या घटनेची माहिती दिली. (Hinjawadi news ) सर्वांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अथक परिश्रम घेतल्यानंतर त्या कुत्र्याच्या तोंडावर अडकलेली बरणी काढण्यात यश मिळाले होते.

Pune chandani chowk : चांदणी चौकातील उड्डाणपूलाच्या कामाची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पाहणी

भुतकर म्हणाले की संस्थेने अशा प्रकारचे रेसी ऑपरेशन यापूर्वी सात वेळा राबवले आहेत. अशा घटनेत प्राण्यांना श्वास मिळतो पण अन्न पाणी न मिळाल्याने त्यांच्या चार-पाच दिवसात मृत्यू होतो.(Hinjawadi news) वाइल्ड एनिमल्स अँड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटी (WASPS) नागरिकांना अशी विनंती करत आहे की आपल्या सुखभोगाच्या नादात आपण निसर्गातील निरागस प्राण्यांच्या जीवाशी खेळतोय का याची आत्मपरीक्षण करावे?

“नागरिकांनी कचऱ्याची योग्य वाट लावावी विशेषतः खाद्यपदार्थ असलेल्या प्लास्टिकच्या बरण्या मोकळ्या झाल्यावर इतरत्र न टाकता त्या कचराकुंडी गावात फिरणाऱ्या घंटागाडीतच टाकाव्यात”, असे भुतकर म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.