Pimpri : गणेशोत्सवासाठी फिडर पिलरमधून लाईट घेवू नका, महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – श्री गणेशोत्सवासाठी वीजजोडणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पथदिव्यांच्या खांबावरील जंक्शन बॉक्स अथवा फिडर पिलरमधून घेऊ नये, असे आवाहन महापालिका विद्युत विभागाने केले आहे.

Pimpri : पर्यवरणपूरक गणेशोत्सवासाठी सामाजिक संस्थांनी सहकार्य करावे, आयुक्तांचे आवाहन

नागरिकांच्या सार्वजनिक सुरक्षिततेकरीता महापालिका कार्यक्षेत्रातील इमारती,सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर प्रकाश व्यवस्थेकरीता दिवाबत्तीची यंत्रणा उभारण्यात आली आहे. या दिवाबत्ती प्रकाश व्यवस्थेची देखभाल दुरुस्तीचे काम महानगरपालिकेमार्फत आवश्यकतेनुसार करण्यात येते. सर्व विद्युत अभियंत्यामार्फत पिंपरी-चिंचवडकरांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील सर्व स्ट्रिट लाईट पोलची तपासणी करण्यात आली आहे. तसेच धोकादायक परिस्थितीमध्ये एकही पोल आढळून येणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.

या कामांमध्ये काही उणीवा/त्रुटी अथवा कोणतेही असुरक्षिततासदृश्य परिस्थिती आढळल्यास म्हणजेच पोलला शॉक लागणे,गंजलेला व धोकादायक पोल ,तुटलेला जंक्शन बॉक्स,फिडर पिलर आढळल्यास खालील संपर्क दुरध्वनीवर तक्रार नोंदविण्यात यावी. फोन नं- ६७३३३३३३, सारथी हेल्पलाईन.-८८८८००६६६६, सारथी ऑनलाईन तक्रार नोंदणी[email protected] वर तक्रार करावी.

१९/०९/२०२३ ते २८/०९/२०२३ दरम्यान श्रीगणेशोत्सव सण साजरा करण्यात येत आहे. हा सण साजरा करताना सर्व श्रीगणेश मंडळांनी व नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पिंपरी-चिंचवड मनपाच्या पथदिव्यांच्या खांबाचा आधार न घेता पथदिव्यांचा पोल व मांडव यामध्ये सुरक्षित अंतर ठेवून श्रीगणेशोत्सव मंडळाची उभारणी करण्यात यावी. तसेच श्रीगणेशोत्सवासाठी वीजजोडणी पिंपरी-चिंचवड मनपाच्या पथदिव्यांच्या खांबावरील जंक्शन बॉक्स अथवा फिडर पिलरमधून घेऊ नये.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने श्री गणेशोत्सवासाठी तात्पुरती वीज जोडणी अगदी अल्प दरात व अल्पकाळात देण्याची व्यवस्था केलेली आहे.तरी सर्व श्री गणेशमंडळांनी याचा लाभ घेऊन अनधिकृत वीज जोडणी टाळावी तसेच विद्युत सुरक्षा पाळून जीवितहानी टाळावी.

नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने याचे कटाक्षाने पालन करा

नागरिकांनी पथदिवे खांब व विद्युत य़ंत्रणेशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करु नये.

खांबाला व फिडर पिलरला स्पर्श करु नये.

पथदिवे खांबातुन विनापरवाना वीज घेऊ नये.

जनावरे खांबांना बांधु नयेत.

जंक्शन बॉक्सवर पाय ठेवुन खांबावर चढु नये.

कपडे वाळत घालण्यासाठी खाबांना तारा बांधु नये.

बांधकामामध्ये पथदिव्यांचे खांब घेऊ नये.खांबांना फ्लेक्स ,होर्डिंग्ज बांधु नये.

कोणत्याही प्रकारची केबल/तार खांबावरुन ओढु नये.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.