Pimpri : पर्यवरणपूरक गणेशोत्सवासाठी सामाजिक संस्थांनी सहकार्य करावे, आयुक्तांचे आवाहन

एमपीसी न्यूज – यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक वातावरणात साजरा करावा यासाठी शहरातील गणेशोत्सवामध्ये सेवा करणाऱ्या अशासकीय संस्था, एनजीओ, पर्यावरणप्रेमींनी सहभाग घ्यावा. या कार्यात महापालिका प्रशासनाकडून संस्थांना संपूर्ण सहकार्य करण्यात येईल असे आयुक्त शेखर सिंह म्हणाले. पर्यवरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सामजिक संस्थांनी नागरिकांना प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.

Pune : आता निवेदन द्यायचे नाही तर मशिदीचे अतिक्रमण आतमध्ये घुसून पडायचे : नितेश राणे

१९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत सर्वत्र मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात साजरा होणाऱ्या यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने तसेच क्षेत्रीय कार्यालयनिहाय आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आणि पर्यावरण प्रेमी यांची बैठक महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील माजी महापौर मधुकर पवळे सभागृह येथे संपन्न झाली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजय खोराटे, उल्हास जगताप, उप आयुक्त रविकिरण घोडके, मिनीनाथ दंडवते, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, संजय कुलकर्णी, बाबासाहेब गलबले, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आरोग्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, किरणकुमार मोरे, राजेश आगळे, सीताराम बहुरे, शीतल वाकडे, उमेश ढाकणे, कार्यकारी अभियंता सतीश वाघमारे, नितीश देशमुख, विजयकुमार काळे, रविंद्र शिंदे, दिलीप धुमाळ, प्रेरणा शिनकर, संध्या वाघ, बापूसाहेब गायकवाड, उपअभियंता सुनीलदत्त नरुटे, सुनील शितोळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम यांच्यासह प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघाचे सुर्यकांत मुथियान, पर्यावरण संरक्षण गती विधीचे ओंकार नाझरकर, सुधीर मारुलकर, जिवीत नदी फौंडेशनच्या वंदना, इको एक्झीस्ट फौंडेशनच्या वृंदा शेटे, के. टी . टी. एफ पोलीस मित्र संघटनेचे अशोक तनपुरे, स्मिता ससाते, नितीन ससाते, नवनिर्माण काच पत्रा कष्टकरी संघाच्या सोनाली कुंजीर, शोभा महावीर, पर्यावरण संवर्धन समितीचे सिकंदर घोडके, कल्पतरू बहुउद्देशीय संस्थेच्या संजीवनी मुळे, ब्रेनवे फौंडेशनचे अशोक सोनावणे, आंघोळीची गोळी संस्थेचे राहूल धनवे आदी सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, गणेश मूर्ती संकलन करणारी वाहने सुस्थितीत असावीत, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत गणेश मूर्ती संकलन केंद्रांची स्थापना करण्यात यावी, पर्यवरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सामजिक संस्थांनी नागरिकांना प्रयत्न करावेत, महापालिका प्रशासनाने तात्काळ शहरातील गणेशोत्सव मिरवणुकीचे मार्ग तसेच सर्व विसर्जन घाट व्यवस्थित करावेत.

तसेच विसर्जनाच्या ठिकाणी पुरेशा विद्युत प्रकाशाची व्यवस्था करावी, नदी घाटावर असणा-या कृत्रिम विसर्जन हौदांची डागडुजी करून आवश्यकतेप्रमाणे इतर ठिकाणी नव्याने कृत्रिम हौद तयार करावे, प्रभाग स्तरावर सार्वजनिक गणेश मंडळे, गृहनिर्माण संस्था, अशासकिय संस्था, पर्यावरणवादी संघटना यांच्याशी समन्वय साधून गणेशोत्सव आनंदी वातावरणात पार पाडावा, असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले.

शहरातील गणेशोस्तव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची उद्या होणार आयुक्तांबरोबर बैठक

पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकारी तसेच प्रतिनिधींची, महापालिकेचे आयुक्त, पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त, विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी यांच्यासह गणेशोत्सव संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक उद्या मंगळवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी ग. दि. माडगुळकर नाट्यगृह येथे सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आली आहे, या बैठकीस शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.