Pune : आता निवेदन द्यायचे नाही तर मशिदीचे अतिक्रमण आतमध्ये घुसून पडायचे : नितेश राणे

एमपीसी न्यूज – अयोध्येत बाबरी मशिद होती.त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी काय केले हे लक्षात आहे ना,आता त्या ठिकाणी भव्य दिव्य राम मंदिर उभारले जात आहे. आता मथुरेमध्ये देखील श्रीकृष्णाच मंदिर उभारले जाणार आहे.त्यानंतर आता पुण्येश्वरच मंदिर परिसरात असलेले मशिदीचे अतिक्रमण हटविले जाणार आहे. आता यापुढे अधिकार्‍यांना निवेदन द्यायचे नाही. तर थेट आतमध्ये घुसून ते मशिदीचे अतिक्रमण पडायचे असा इशारा भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी महापालिका प्रशासनाला दिला.

Pune : दहीहंडी निमित्त गुरुवारी पीएमपीएमएलच्या काही मार्गांत तात्पुरता बदल

तर आता आम्हाला देखील ताकद पहायची आहे.कोणामध्ये किती ताकद आहे.महेश लांडगे यांनी केली घोड्याची भाषा,तर दुसर्‍या एकाने हातोडयाची भाषा केली,पण आपल डायरेक्ट कापण असत. भाषा वैगरे काही नसते. अस भाषणा दरम्यान नितेश राणे यांनी वादग्रस्त विधान केले.

पुणे शहरातील कसबा पेठ भागात असलेल्या पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील मशिदीचे अतिक्रमण हटविण्यात यावे.या मागणीसाठी पुण्येश्वर पुनर्निर्माण समितीच्या वतीने पुणे महापालिकेच्या बाहेर भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले.आमदार महेश लांडगे, समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या सह विविध हिंदू संघटनांचे प्रतिनिधी आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी नितेश राणे म्हणाले की,पुण्येश्वर मंदिराच्या परिसरात मशिदीचे अतिक्रमण करण्यात आले आहे.याबाबत अनेक वेळा आमच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.त्या दरम्यानच्या कालावधीत त्या ठिकाणी चार मजली इमारत बांधली गेली होती.त्यावेळी महापालिका प्रशासनाचे अधिकारी काय करित होते.

आम्ही कारवाईची मागणी केली की,आमच्या पदाधिकाऱ्यांना कायद्याचा धाक दाखविला जात आहे.आम्ही कायदे पाळणारे मंडळी असून आजपर्यंत कायदा पाळला आहे. हे पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी लक्षात ठेवावे.तसेच आपल्या देश हिंदूच असुन तुम्ही कशाला जिहादयाचे लाड करता.

तुम्हाला ते वाचविण्यास येणार नाही. मी आणि महेश लांडगे यांनी विधानसभेत थोबाड उघडल.तर तुमची खुर्ची वाचविण्यास कोणीही येणार नाही. प्रत्येक विधानसभा अधिवेशनात किमान दोन अधिकार्‍यांना निलंबित करण्याचा माझा आजपर्यंत स्ट्राईक रेट आहे आणि मी तेव्हाच घरी जातो. असा इशारा महापालिका अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी दिला.

तसेच ते पुढे म्हणाले की,पुण्येश्वर मंदिराच्या परिसरात मशिदीचे अतिक्रमण हटविण्या बाबत महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर पावलं उचलावी.अन्यथा आम्ही यापुढील काळात अधिकार्‍यांना निवेदन किंवा आंदोलन करणार नाही. तर थेट मंदिर परिसरात मशिदीचे जे अतिक्रमण झाले आहे. ते आम्ही पडू, त्या घटनेला महापालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.