Ghoravadeshwar : घोरावडेश्वर डोंगरावरील वनमेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज : दरवर्षी प्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्गमित्र विभागाचा वनमेळावा (Ghoravadeshwar) रविवार 16 ऑक्टोबर रोजी संपन्न झाला.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर्यावरण गतिविधी प्रांतप्रमुख डॉ. श्री राहुलजी मुणगीकर, जिल्हा संघचालक विनोद बन्सल, देहूरोड कँन्टोन्मेट बोर्डचे माजी उपाध्यक्ष ऍड.  कैलासजी पानसरे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी सहशहर अभियंता व पवना जलदिंडी अभियान प्रमुख प्रविण लडकत, जयश्री व कर्नल रविकिरण कदम, वनविभागाच्या अधिकारी रेखा वाघमारे, प्रा. शैलजाताई सांगळे यांच्यासह स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे नवनिर्वाचित, आजी, माजी पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, सर्व विभागाचे कार्यकर्ते तसेच पिंपरी चिंचवड व पंचक्रोशीतील विसपेक्षा अधिक संस्थांचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते.

निसर्ग मित्र विभागाचे सर्व स्वयंसेवक (Ghoravadeshwar) आस्थेने आलेल्या सर्वांचे स्वागत करीत होते. हरित घोरावडेश्वर प्रकल्पाचे प्रदर्शन दाखवून माहिती देत होते. त्याबरोबरच या प्रकल्पात सहभागी होण्याचे आवाहन करीत होते. बाल निसर्गमित्रांनी उत्साहाने आवाहनपत्र, पर्यावरण प्रतिज्ञापत्र व चहा- बिस्कीटांचे वाटप केले.

हरित घोरावडेश्वर प्रकल्पात योगदान देत असलेल्या संस्था व व्यक्तींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. अविरत श्रमदान- दिघी, स्वच्छ इंद्रायणी अभियान, वृक्षवल्ली परिवार, देवराई, चला मारु फेरफटका, विजय जगताप मित्र परिवार-पिंपळे गुरव, पवना जलदिंडी, भावसार व्हिजन, ओम निसर्ग मित्र, सायकल मित्र, सायकल निसर्ग मित्र, इंडो एथलेटिक्स सोसायटी, यश स्पर्धा एकेडमी, पिंपरी चिंचवड माऊंटेनियरींग क्लब, साई कॉम्प्युटर, पोलीस नागरिक मित्र , महात्मा फुले शाखा, पुनावळे , पवना प्रभात शाखा, थेरगाव आदिंचा गौरव करण्यात आला.

BJP : ऋतुजा लटके यांच्या पराभवाच्या भीतीने अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार – आनंद रेखी

राहुल मुणगीकर यांनी यावेळी पर्यावरण गतीविधी व हरितघर संकल्पना विषयी सविस्तरपणे माहिती दिली.  प्रविण लडकत यांनी पवना जलदिंडी ची माहिती देऊन आगामी काळात सर्वांना जलदिंडी मध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले. ऍड. कैलास पानसरे, सचिन भैय्या लांडगे, अजित पाटील, सुनील पाटील, भाऊसाहेब जाधव, रेखा वाघमारे, सुजाता बाऊसकर आदींनी मनोगते व्यक्त केली.

विनोद बन्सल यांनी समारोप केला. यावेळी 175 पेक्षा जास्त पदाधिकारी, निसर्गमित्र व पर्यावरण प्रेमी उपस्थित होते. यामध्ये महिला व बालांची संख्या लक्षणीय होती. अनेकांनी प्रदर्शनाला भेट देऊन प्रकल्प समजून घेतला. सामुदायिक पर्यावरण संवर्धन प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
विजय सातपुते व दयानंद भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.

निरोप देणे, प्रदर्शन लावणे, अल्पोपहार व्यवस्था, सर्वांचे स्वागत, माहिती देणे, ओळखी करून घेणे आदि सर्व बाबी निसर्ग मित्रांनी स्वयंस्फूर्तीने व कल्पकतेने केल्यामुळे नेहमीप्रमाणे वनमेळावा यशस्वीपणे संपन्न झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.