Nigdi : गरीबांना स्वंयसेवी संस्थेकडून मोफत अन्नधान्य वाटप

एमपीसी न्यूज – लाॅकडाऊनमुळे घरातच अडकून पडलेल्या अनेक गरीबांचे जेवणाचे हाल होत आहेत. हातावर पोट असणाऱ्या अनेकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अग्रसेन ट्रस्टने एक पाऊल पुढे टाकत गरीबांना मोफत अन्नधान्य वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. झोपडपट्टीतील गरीब लोक, वृद्धाश्रम, अनाथाश्रम ट्रस्ट कडून त्यांना मदत पोहचवली जात आहे.

या उपक्रमात निगडी प्राधिकरण पोलीस स्टेशनचे अन्सार शेख, अग्रसेन ट्रस्ट चिंचवड सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, उत्सव कमिटीचे अध्यक्ष वेदप्रकाश गुप्ता, सतीश सोनावणे आदींनी सहभाग घेतला.

अग्रसेन ट्रस्टच्या वतीने गरीबांना पीठ, तेल, मीठ, डाळ,भात, चहा पावडर, साबण, साखर, यांचे वाटप केले जात आहे. सर्व ठिकाणी कडकडीत बंद ठेवण्यात आल्यामुळे एकाच ठिकाणी अडकून पडलेल्या अनेक गरीबांचे जेवणाचे हाल होत आहेत. रोजगार सुद्धा उपलब्ध नसल्याने गरीबांना मदत करण्याची भूमिका घेतल्याचे अनिल अग्रवाल सांगतात.

ज्या लोकांना या कामासाठी मदत करण्याची इच्छा आहे. त्यांनी अनिल अग्रवाल यांना 9373337935 / 8888654321 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन अग्रसेन ट्रस्ट कडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.