Dehuroad : सिगारेट ओढताना हटकल्यावरून एकाला शिवीगाळ करून धमकावले

0

एमपीसी न्यूज – सिगारेट ओढताना एकाला हटकल्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यामध्ये एकाला बघून घेण्याची धमकी देत बोटाला जखम केली. ही घटना मंगळवारी (दि. 24) रात्री नाऊच्या सुमारास बोडकेवाडी, देहूरोड येथे घडली.

विठ्ठल भिकाजी पिंजण (वय 57, रा. बोडकेवाडी, देहूरोड) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. 25) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नितीन गोरख जाधव (वय 40, रा. बोडकेवाडी, देहूरोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मंगळवारी रात्री त्यांच्या घरासमोर सिगारेट ओढत बसले होते. त्यावेळी आरोपी त्यांच्याजवळ येऊन ‘काय फुकण्या ओढतो’ असे म्हणाला. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करत बघून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर, फिर्यादी यांचा डावा हात पिरगाळून करंगळीजवळच्या बोटाला जखम केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2
You might also like