Pune : महात्मा फुले मंडईत भाजी खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी!

भाजीपाला उपलब्ध करून देण्याचं प्रशासन केवळ आश्वासन

एमपीसी न्यूज – पुणेकरांना जीवनावश्यक वस्तू मिळणार असल्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे वारंवार करण्यात येत आहे. तरीही गुरुवारी पुणेकरांनी सकाळी महात्मा फुले मंडईत भाजी खरेदी करण्यासाठी गर्दी केली.

इतर ठिकाणी भाजी विक्रेत्यांनी दुप्पट-तिप्पट दराने भाजीपाला विक्री करण्यात येत आहेत. त्यामुळे स्वस्त दरात मिळणार म्हणून पुणेकरांनी मोठ्या संख्येने मंडईत गर्दी केली आहे.

‘कोरोना’चे रुग्ण पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एक प्रकारचे युद्धच सुरू असल्याची सध्याची परिस्थिती आहे. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आपल्याला भाजीपाला मिळणारच नाही. या विचाराने पुणेकर आठवडाभराचा भाजीपाला खरेदी करीत असल्याचे चित्र सर्रासपणे दिसून येत आहे.

महात्मा फुले मंडईतील गर्दी टाळण्यासाठी प्रशासन नागरिकांना भाजीपाला कसा उपलब्ध करून देणार? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. प्रशासन केवळ आश्वासन देत आहे. पण, कृती कधी करून सोय करणार? असाही सवाल पुणेकर उपस्थित करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.