Pune : डॉ. माधुरी जोगळेकर यांना ‘वाग्देवी सरस्वती पुरस्कार’ प्रदान

एमपीसी न्यूज – ‘फॅमिली फिजिशियन’ म्हणून  ४० वर्षांच्या वैद्यकशास्त्रातील योगदानाबद्दल डॉ. माधुरी जोगळेकर यांना वैद्यकशास्त्रातील ‘वाग्देवी सरस्वती पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.

अॅस्ट्रोव्हिजन आणि शब्दसारथी या संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. जोगळेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अॅस्ट्रोव्हिजनचे अध्यक्ष डॉ. संदीप अवचट, शब्दसारथीचे संचालक पराग पोतदार, सुधीर जोगळेकर आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ.जोगळेकर या त्यांच्या वैद्यकीय कारकीर्दीबद्दल प्रसिद्ध आहेतच, परंतु त्यांनी संगीताचा छंदही जोपासला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.