Akurdi : डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये आरसीसी डिझाईनवरील दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात 

एमपीसी न्यूज  – आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च कॉलेज येथे आरसीसी डिझाईन अॅण्ड क्वॉलिटी कंट्रोल या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. 

या कार्यशाळेसाठी इनोव्हेटिव्ह कन्सल्टंसी सर्व्हिसेसचे कन्स्ट्रक्शन क्वालिटी कन्सलटंट राघवेंद्रसिंह बैस व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुपमा पाटील, स्थापत्य विभागाच्या प्रमुख प्रा. अमृता कुलकर्णी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले.

यावेळी राघवेंद्रसिंग बैस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत एज्युनोव्हा स्कूल ऑफ फॉरेन लँग्वेज फॉर जर्मनचे धनेश जोशी, सी. वर्ल्ड आय.टी सर्व्हिसेसचे पराग वर्तक, एट २४ ईटीरीअर डिझाईन उमेर कुरेशी यांचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेत महाविद्यालयातील ६० विद्यार्थी सहभागी होते. संस्थेचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील, संस्थेचे संचालक कर्नल एस. के. जोशी, उपकुलसचिव वाय.के. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रा. मिथुन सावंत यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.