Nigdi : पॅनऑर्थो रुग्णालयाच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरात ३३० जणांचा सहभाग

एमपीसी न्यूज – प्राधिकरण येथील पॅनऑर्थो रुग्णालयाच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ३३० नागरिकांनी सहभाग घेतला.

या शिबिरात रक्ताच्या तपासण्या व हाडांची ठिसुळता  तपासणी, अस्थिरोग तसेच दंतरोग तपासणी मोफत करण्यात आली. या शिबिरामध्ये डॉ. राहूल बोंद्रे, डॉ. मंदार आचार्य, डॉ. उमेश जाधव, डॉ. एस. प्रशांत, डॉ. विशाल मोहिते आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी मोफत आरोग्य तपासणी केली.
या शिबिरासाठी अनुप मोरे फाऊंडेशन, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कर्मचारी, राजमुद्रा ग्रुप, स्वकुळ माळी समाज आदी संस्थानी शिबिरासाठी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.