Bhosari :आनंद हॉस्पिटलतर्फे आयोजीत आरोग्य शिबिरात दिड हजार रुग्णांनी घेतला लाभ

एमपीसी न्यूज –  भोसरी येथील आनंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल द्वारे डॉक्टर्स डे निमीत्त 1 ते 7 जुलै दरम्यान सात दिवसांचे (Bhosari )आरोग्य शिबिर आयोजीत केले होते. या शिबिराला नागरिकांनी उदंड प्रतिसाद देत तब्बल दिड हजार रुग्णांनी लाभ घेतला.

Kondhawa : कोंढवा बुद्रुकमध्ये गोडाऊनला भीषण आग

हे शिबिर पूर्णपणे मोफत ठेवण्यात आले होते. या शिबिरामध्ये  सात तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली.

रक्त लघवीच्या सर्व तपासण्यांवर 50% सवलत देण्यात आली. 35 वर्षे अविरत सेवा देणारे भोसरीतील आनंद हॉस्पीटल हे एकमेव हॉस्पिटल आहे.

या शिबिरात डॉ. अंकिता चावला यांनी वयात येणाऱ्या मुलांना मार्गदर्शन, मासीक पाळीवरील उपचार, गर्भाशयासाठीचे उपचार याबाबत मार्गदर्शन व उपचार केले.

तर डॉ. कृष्णा दळवी यांनी हृदयरोग, मधुमेह,रक्तदाब याबाबत उपचार केले, डॉ. प्रज्वल सदलगी व डॉ.सत्यनारायण वाडाणे यांनी हाडांचे विकार, संधीवात, मणक्याचे आजार याबाबत सल्ला व उपचार दिले.

डॉ. विनायक माने व डॉ. पवन धारुरकर यांनी पोटाचे विकार, मुळव्याध, कॅन्सर आदी बाबत उपचार केले.

तसेच डॉ.संतोष मोरे यांनी सर्दी ताप, बालरोग, मलेरिया आदी बाबात सल्ला व उपचार केले.

मागील 35 वर्षांपासून रुग्णांच्या सेवेत असणाऱ्या आनंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल हे डॉ. दत्तात्रय तांबे,डॉ. पांडुरंग लांडगे व डॉ. संतोष मोरे यांच्या संचालनात काम करत आहे.

या हॉस्पीटलमध्ये अतिदक्षता विभाग, अपघात विभाग,मधुमेह, हृदयरोग यावरील आधुनिक उपचार, जनरल प्लास्टीक सर्जरी, कॅन्सर सर्जरी,डोळे, कान,नाक घसा, हाडांचे व त्वचा विकार आदी बाबात उपचार व डॉक्टर उपलब्ध आहेत.

त्यामुळे रुग्णांना सर्वच विकारांचे खात्रीशीर इलाज एकाच छताखाली (Bhosari ) मिळतो.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.