Moshi News : मोशीत शनिवारी महारोजगार, विवाह संस्कार मेळावा, आरोग्य शिबिर

एमपीसी न्यूज –  अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पिठाधीश गुरु माऊली आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत 11 फेब्रुवारी ला PIECC ग्राउंड मोशी, (Moshi News) पुणे येथे 11 लाख भाविकांच्या उपस्थितीत महासत्संग मेळावा आयोजित केला आहे.

या महासत्संग मेळाव्यात विविध सामाजिक उपक्रम घेण्यात येणार आहेत. या मध्ये विवाह संस्कार विभागांतर्गत सर्व धर्मीय वधुवर परिचय मेळावा तसेच जवळपास 5 हजार विवाह निश्चितीचे उद्दिष्ट आहे. स्वयंरोजगार विभागा अंतर्गत महारोजगार मेळाव्यात परिसरातील 350 पेक्षा अधिक देशी व विदेशी कंपन्यांमध्ये 11000 जागा महाभरतीचे उद्दिष्ट आहे. उद्योजक विकास धोरण अंतर्गत 11000 पेक्षा जास्त युवक युवतींना व्यवसाय प्रशिक्षण व मार्गदर्शन तसेच विविध उद्योगांचे 500 हुन अधिक स्टॉल उपलब्ध करण्यात आले आहेत.

राष्ट्रकल्याणाकरीता सव्वा कोटी श्री गणपती अथर्वशीर्ष आवर्तन तसेच श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्र पठण, जगत् गुरु श्री तुकाराम महाराजांचा अभंग व पसायदान पठण होणार आहे.(Moshi News) विविध आजारांच्या 200 तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

Shirgaon News : अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामवर बदनामी

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यात सेवामग्न आहे. नाशिक शहरापासुन जवळ दिंडोरीहुन गेल्या सात दशकांपासून सामाजिक सुधारणेसाठी श्री स्वामी समर्थ सेवामार्ग निरंतर सर्व सामन्यांच्या उध्दारासाठी कार्यरत आहे. व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण, बिना-हुंडा सामूहिक विवाह, कृषि विकास, सांप्रदायिक सद्भाव, बालसंस्कार अश्या विविध विनामूल्य उपक्रमांसह दिंडोरी येथून सुरु झालेला सामाजिक विकासाचा हा राजमार्ग आता हजारों सेवाकेन्द्रांच्या माध्यमातुन विश्वशांतीचा संदेश देत भारतीय परंपरा आणि संस्कृतिचा गौरव संपूर्ण विश्वात प्रसारित करत आहे.

गुरुमाऊली यांच्या मार्गदर्शनाखाली आज सेवामार्गाचे सुमारे 7 हजारहुन अधिक सेवाकेंद्र भारतातील महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, जम्मू, उत्तरप्रदेश, तेलंगाना, तामिळनाडु, केरळ, असे विविध राज्य आणि नेपाळ, अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, यूरोप, ऑस्ट्रेलिया, दुबई, ओमान, अश्या विविध देशांमध्ये कार्यरत आहेत.

ग्राम आणि नागरी विकास अभियानात 18 विभागाच्या द्वारे ज्यात गर्भसंस्कार, शिशु संस्कार, बालसंस्कार, युवा प्रबोधन, कृषी, विवाह संस्कार, प्रश्नोत्तरे, वास्तुशास्त्र, वेद विज्ञान, पर्यावरण, दुर्ग संवर्धन, पशु व गौवंश संवर्धन, स्वयंरोजगार, भारतीय संस्कृती, कायदा जागरूकता, आरोग्य आणि आयुर्वेद, आयटी विभाग, प्रशिक्षण विभाग, देश विदेश अभियान विभाग, आणि प्रशासकीय विभाग यांचा समावेश आहे. या सर्व उपक्रमांचा परिणाम म्हणून आज लाखो लोक व्यसनमुक्त, निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत.

सेवेकरी तरुणांना करिअर समुपदेशन करणे, स्वयंरोजगारासाठी विविध प्रशिक्षणांचे आयोजन करणे, महिलांसाठी बचत गटांद्वारे स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, गर्भवती महिलांसाठी गर्भसंस्कार शिबिरे आयोजित करणे, आशा सेवक आणि मातांसाठी शिशु संस्कार प्रशिक्षण देणे, (Moshi News) पालकांसाठी पालकत्व मार्गदर्शन, शिक्षक मांदियाळी, विद्यार्थ्यांसाठी विविध प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करणे, शेतक- यांसाठी बांधावर जाऊन विविध मार्गदर्शन, वृक्ष लागवड व संवर्धन,

दुर्ग संवर्धन, नदी स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिरे, अन्नदान, वस्त्रदान, आरोग्य शिबिरे, दुष्काळ व पूरस्थितीत मदत कार्य, प्रत्येक वर्षी 1 कोटी वृक्ष लागवड, सेंद्रिय नैसर्गिक आणि आध्यात्मिक शेती मार्गदर्शन, सामूहिक विवाह समारंभ, रोगनिदान व आरोग्य शिबिरांचे आयोजन, आदिवासी व अतिमागास भागात चालते फिरते रुग्णालय व रुग्णवाहिका आदी विविध सामाजिक उपक्रम सतत राबवत असतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.