Pimpri : बार्शी तालुक्याचा स्नेहमेळावा पिंपरी-चिंचवडमध्ये उत्साहात

एमपीसी न्यूज –  बार्शी तालुका पिंपरी-चिंचवड पुणे रहिवासी संघाच्या वतीने बार्शीकर परिवाराचा स्नेह मेळावा व धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर व माढ्याचे खासदार रणजीत सिंह निंबाळकर या नूतन खासदारांचा सत्कार समारंभ  नुकताच पिंपरी-चिंचवडमध्ये झाला.

छत्रपती शिवाजी महाराज व शाहू फुले आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. तालुका बार्शी पुणे पिंपरी- चिंचवड रहिवाशी संघाच्या वतीने आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार तलवार फेटा पुष्पगुच्छ श्रीफळ शाल देऊन केला. या मेळाव्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार राजाभाऊ राऊत व बार्शी नगराध्यक्ष अॅड. आसिफ तांबोळी व शिवसेना नेते इरफान भाई सय्यद या नगरअध्यक्ष विश्वास बारबोले माजी उपसभापती केशव बापू घोगरे, जिल्हा परिषद सदस्य अनिल डिसले, जिल्हा परिषद सदस्य मदन दराडे, माजी आरटीओ हरिश्चंद्र गडसिंग, गौरव आप्पा माने, सोलापूर जिल्हा परिषद सभापती बार्शी नगरपालिका भैया बारंगुळेर, कुंडलिक गायकवाड, डॉक्टर पंखे, काकासाहेब डेंगळे, शिवसेना उपशहरप्रमुख नेताजी  काशीद आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने बार्शी तालुक्यातील हजारो नागरिक पिंपरी-चिंचवड पुणे येथे राहत असलेले या मेळाव्यास उपस्थित होते. बार्शी तालुक्यातील मोठ्या हुद्द्यावर काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी माजी आमदार राजाभाऊ राऊत हस्ते करण्यात आला. बार्शी तालुक्यातून या स्नेहमेळाव्यासाठी आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार बार्शी तालुका पिंपरी-चिंचवडचा रहिवाशी संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. बार्शी विधानसभेचा प्रचाराचा तालुका बार्शी पुणे पिंपरी – चिंचवड रहिवासी यांच्या स्नेह मेळाव्याच्या माध्यमांतून आमदार राजाभाऊ राऊत यांनी बार्शी विधानसभेचा शड्डू ठोकला.

या कार्यक्रमाचे आयोजन तालुका बार्शी पुणे पिंपरी-चिंचवड रहिवासी संघ यांनी केले होते. तसंच सोलापूर जिल्हा परिषद सदस्य किरण मोरे, देवा कुलकर्णी, युवा सेना अधिकारी बाजार समिती संचालक अण्णा चोरघडे, बाळासाहेब काकडे, संतोष शिंदे, दिनेश मोरे,  शिवाजी कापसे, प्रशांत कानडे, विकास गरड, नाना घावटे, अजित पाटील आदींनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.