Chinchwad : भारतमाता सत्संग मंडळात कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी 

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील भारतमाता सत्संग मंडळाच्या वतीने कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने श्रीधरनगर येथील दत्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. भारत माता सत्संग मंडळ हे गेल्या १२ वर्षापासून कृष्ण जन्माष्टमीचे विविध कार्यक्रम राबविते. यावर्षी ज्ञानेश्वर जयंती व कृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून मंडळाने दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी गायत्रीमंत्राच्या पठणाने सरूवात झाली. त्यानंतर गायत्री होम आयोजित करण्यात आला होता. या होमसाठी कर्नाटकमधील तडस येथून पुजारी आले होते. मंत्रांच्या जयघोषात अतिशय भक्तिपूर्ण व प्रसन्न वातावरणात गायत्री होम व पूर्णाहती संपन्न झाला.

यावेळी दत्तपज्ञा संस्थेचे धवल आपटे उपस्थित होते. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सत्संग मंडळाच्या सभासदांचा हिंदी-मराठी कृष्णावरील गाण्यांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी तबला अजय जोशी तसेच हार्मोनियम कुलकर्णी यांनी साथसंगत केली. तसेच महिलांनी गरबा नृत्य अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात सादर केले. संध्याकाळी नामवंत गायक संजय गरुड यांच्या गायनाचा कार्यक्रम होता. यामध्ये त्यांनी इंद्रायणीकाठी, विठुमाऊली तु माऊली जगाची, विठ्ठलाचे अभंग तसेच कृष्णाची गीते सादर केली. संपदा फडके यांच्या जन्माष्टमीच्या श्रवणीय किर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमात मंडळाचे कार्यकर्ते संजय भंडारी, व्यंकटेश कुलकर्णी, नार्वेकर, बावीसकर, काकडे, खटावकर, आशा देशमुख, श्रीमती दांडेकर आदि उपस्थित होते. भारतमाता सत्संग मंडळाचे अध्यक्ष प्रशांत हरहरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.