Chinchwad: मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सवात हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

एमपीसी न्यूज – श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी(Chinchwad) महोत्सवाचे यंदा 462 वे वर्ष आहे. संजीवन समाधी महोत्सवाच्या 5 व्या दिवशी म्हणजेच मंगळवारी दुपारी 12 :00 वाजता महाप्रसादास सुरुवात झाली. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

29 जानेवारी 2023 ते 2 जानेवारी 2024 या कालावधीत चिंचवड येथे श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांचा 462 वा संजीवन समाधी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

Pune : पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्यासंदर्भात उद्या होणार बैठक

त्या अनुषंगाने मागील चार दिवसांपासून महाप्रसादाची तयारी सुरू होती. यामध्ये शेकडो भाविकांनी विविध कार्य करत महासाधू श्री मोरया गोसावी महाराज महोत्सवात आपली सेवा रुजू केली.

 

आज दुपारपासून म्हणजेच महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी (Chinchwad)दुपारच्या सत्रात भाविकांसाठी महाप्रसादांचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.

सलग 5 दिवस सुरू असलेल्या या महोत्सवात लाखो भाविकांनी सहभाग नोंदविला आहे. विविध सामाजिक,धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा महोत्सव अविस्मरणीय ठरला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.