Talegaon Dabhade : स्वप्ननगरी गणेश व नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने कोजागरी पौर्णिमा साजरी

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील स्वप्ननगरी गणेश व नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने कोजागरी पौर्णिमेनिमित्त या वर्षी नवरात्रात झालेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ नागरिक आणि कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

नवरात्रोत्सवात झालेल्या स्पर्धांमध्ये सोसायटीतील मुले, मुली आणि महिलांनी आपला सहभाग नोंदवून क्रमांक पटकाविले आहे, या स्पर्धेचा निकाल जाहीर करून विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

सकाळचे बातमीदार रामदास वाडेकर व सचिन शिंदे यांना आदर्श पत्रकार ,राष्ट्रपती पारितोषिक विजेते लहु पाटील बुवा ढेरंगे यांना वृक्षमित्र, गुरुनाथ मयेकर, शशिकांत धनगे यांना गुणवंत कामगार पुरस्काराने गौरविण्यात आले. उत्कर्ष महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला.

_MPC_DIR_MPU_II

माजी नगराध्यक्षा व नगरसेविका सुलोचना आवारे आणि उद्योजक किशोर आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक गणेश काकडे, नगरसेवक सुनिल कारंडे,नगरसेवक रोहीत लांघे यांच्या हस्ते पुरस्कार व बक्षीस वितरण झाले.

यावेळी सौरभ सावंत, विठ्ठल भरड, माधव जोशी, सुधाकर रेंबुटकर,सागर वडर उपस्थित होते. मंडळाच्या कार्यकर्त्याने परिसराची स्वच्छता केली होती, दूध वाटप व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

विराज सावंत यांनी प्रास्ताविक केले. पल्लवी वंजारी यांनी सूत्रसंचालन केले. अभिजित शिंदे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.