Pune : बांधकाम व्यावसायिकाचे 22 लाख घेऊन चालक फरार

एमपीसी न्यूज : बांधकाम व्यावसायिकाकडे चालक म्हणून काम करणार्‍या तरुणाने २२ लाखांची रोकड घेवून पोबारा केल्याची घटना शनिवार पेठ भागात घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस (Pune)  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसप्पा वाल्मिक शिंगरे (३६, रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत नंदकिशोर शहा यांनी तक्रार दिली आहे.

Pune : मैत्रिणीला सोडायला आला अन् घात झाला, वाचा काय झालं?

सोमवारी (दि.२२) दुपारी ही घटना घडली. शहा हे बांधकाम व्यावसायिक आहेत. तर, बसप्पा त्यांच्याकडे मागील सहा ते सात वर्षांपासून चालक म्हणून कामास आहे. त्यामुळे तो शहा यांच्या विश्वासातील होता. अनेकदा त्याला पैशांची ने – आण करण्यास सांगितलेले होते.

सोमवारी दुपारी शनिवार पेठेतील (Pune)  पेपर गल्ली भागातून २२ लाख ६५ हजार रुपये घेवून येण्यासाठी बसप्पा याला पाठविले होते. बसप्पा पैसे आणण्यास गेला. पण, पैसे घेऊन तक्रारदार यांना न देता पळ काढला. काही वेळानंतर त्याचा फोन लावला असता तो बंद होता. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.