Pune : मैत्रिणीला सोडायला आला अन् घात झाला, वाचा काय झालं?

एमपीसी न्यूज : कॉलेजमधील मित्र दुचाकीवरून घरी सोडण्यास आल्याचे पाहिल्यानंतर त्या मित्राचा चांगलाच त्रागा उडाला. या महिलेला खाली बोलावून तिच्याशी अश्लिल वर्तन करुन तिचा विनयभंग केला. तर तिच्या मोबाईलमधील मित्राबरोबरचे आक्षेपार्ह फोटो नातेवाईकांना पाठवून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Pune : पुणे-मेहकर एसटी अपघातातील मृतांच्या वारसांना एसटीतर्फे दहा लाख रुपये

याप्रकरणी पिसोळी येथील एका ३७ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार संतोष मुनेश्वर (वय ४५) याच्यावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार यांचा कॉलेजमधील मित्र त्यांना गाडीवर घेऊन घरी आलेला होता. ही बाब संतोषने पाहिली. हे पाहिल्याने त्याचा राग अनावर झाला. त्याने तक्रारदारांना खाली बोलावले. तिला शिवीगाळ करुन तिच्याशी अश्लिल वर्तन करुन विनयभंग केला. तिचा मोबाईल घेतला.

त्यातील फेसबुक व व्हॉटसअ‍ॅपवरुन त्यांचा भाऊ व चुलत बहिणीचे पतीला कॉलेजमधील मित्रासोबत असलेले आक्षेपार्ह फोटो पाठवून बदनामी केली. पोलीस निरीक्षक भोसले तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.