Talegaon Dabhade : तळेगाव शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी संध्याराजे दाभाडे यांची निवड

एमपीसी न्यूज : तळेगाव शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी श्रीमंत संध्याराजे दाभाडे यांची निवड करण्यात आली. त्यांना महाराष्ट्र राज्याचे मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. ही निवड महिला जिल्हाध्यक्ष सीमा सावंत यांनी केली.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप, खजिनदार महेश ढमढेरे, संग्राम मोहोळ, सचिन हाके आदी उपस्थित होते.

निवडीनंतर संध्याराजे म्हणाल्या आमच्या घराण्याला पहिल्यापासून काँग्रेस  विचारसरणी मान्य असून आमच्या सासूबाई अंजलीराजे दाभाडे  या लोकनियुक्त तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष होत्या. तर सासरे कै. अजितसिंहराजे दाभाडे यांनी देखील नगराध्यक्षपद भूषविले आहे.

पूर्वीपासून घराण्याला राजकीय वारसा आहे पक्ष संघटना बळकट करण्यासाठी व काँग्रेसच्या सर्व योजना तळागाळातील लोकांना पोचविण्यासाठी प्रयत्नशील राहू. काँग्रेसची विचारधारा ही प्रत्येक महिलेपर्यंत कशी पोचवता येईल यासाठी प्रयत्न करू.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.