Talegaon Dabhade : तळेगाव शहर युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी शुभांगी शिंदे

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील तळेगाव शहर युवती कॉग्रेसच्या अध्यक्षपदी शुभांगी शिंदे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी राज्याचे मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले ही निवड महिला जिल्हाध्यक्ष सीमा सावंत यांनी केली. 

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष व पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, जिल्हा खजिनदार महेश ढमढेरे, संग्राम मोहोळ, सचिन हाके आदी मान्यवर उपस्थित होते.

पक्षवाढीसाठी व काँग्रेसच्या सर्व योजना शहरातील गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा विशेष प्रयत्न करणार असून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी विशेष लक्ष देणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.