Talegaon : नूतन महाविद्यालयात मंगळवारी मोफत रोजगार मेळावा

३५ हून अधिक कंपन्यांचा सहभाग, इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन

एमपीसी  न्यूज – पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालीत तळेगाव येथील नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये (एनसीईआर) डिप्लोमा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

तळेगाव येथे होणा-या रोजगार मेळाव्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी मंगळवारी (दि. 22 जानेवारी) सकाळी 9 वाजता तळेगाव येथील कॅम्पसमध्ये आपल्या सर्व कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन पीसीईटी आणि नूतन ग्रुपचे मध्यवर्ती प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता व महाराष्ट्र ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. शीतलकुमार रवंदळे यांनी केले आहे.

या रोजगार मेळाव्यात संपूर्ण महाराष्ट्रभरातून मागील तीन वर्षात विविध शाखांमधून डिप्लोमा (अभियांत्रिकी पदविका) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (एनसीईआर), भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाचे बोर्ड ऑफ ट्रेनिंग (बोट), मुंबई व महाराष्ट्र ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या अॅप्रेन्टिसशिप आणि रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये जीई, टाटा ऑटोकॉम्प, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, जेबीएम, जयहिंद इंडस्ट्रीज, झेड.एफ. इंडिया, एसकेएफ अशा राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय पस्तीसहून जास्त कंपन्यांचे प्रतिनिधी एक हजार पदांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतील. हा रोजगार मेळावा विनामूल्य असून डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी www.ncerpune.com आणि https://tinyurl.com/pcet-boat-registration  यावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी.

हा रोजगार मेळावा म्हणजे नामंकित आस्थापनांमध्ये गरजू आणि होतकरु पदविकाधारकांना रोजगाराची संधी पर्वणीच ठरणार असल्याने, संबंधितांनी याचा लाभ घ्यावा, असेही आवाहन आयोजकांनी केले आहे.

पीसीईटी आणि नूतन ग्रुपचे ज्ञानेश्वर लांडगे, पद्मा भोसले, कृष्णराव भेगडे, आमदार संजय भेगडे, विठ्ठल काळभोर, शांताराम गराडे, भाईजान काझी, संतोष खांडगे, राजेश म्हस्के, पीसीईटी व नूतन चे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर, प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, प्राचार्य डॉ. ललितकुमार वधवा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. विजय टोपे, प्रा. ऋषिकेश पांडे, प्रा. सायली पुजारी, प्रा. महेश देशमुख, प्रा. श्रीधर शरनप्पा आदींनी या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.