BNR-HDR-TOP-Mobile

Pune : समान पाणीपुरवठा, मेट्रोचे काम तातडीने पूर्ण करण्याला प्राधान्य – नवनिर्वाचित महापौर मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज – 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजना, मेट्रोचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. 

स्मार्ट सिटी मार्फत अनेक कामे सुरू आहेत. नदी संवर्धन, शिवसृष्टीसाठी सर्वांनी एकत्र यावे. लहुजी वस्ताद साळवे स्मारक, चांदणी चौक उड्डाणपूल, एचसीएमटीआरचा प्रकल्प मार्गी लावावा लागणार आहे. पुणेकरांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे.

पुणे महापालिकेच्या महापौरपदी माझी निवड झाल्याचे भाग्य समजतो. सर्वच विरोधी पक्षांशी संवाद साधण्याला प्राधान्य असेल. स्थायी समितीत काम करीत असताना काही योजना आणल्या. पुण्यात जे प्रकल्प सुरू आहेत, ते पूर्ण करण्यावर भर असेल.

HB_POST_END_FTR-A2

.