Board Exam : बारावी बोर्डाच्या पहिल्याच पेपरमध्ये त्रुटी, विद्यार्थ्यांना न्याय देणार, शिक्षणमंडळाचे स्पष्टीकरण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या बोर्ड परीक्षांना आज (दि.21) पासून सुरुवात झाली आहे.(Board Exam) आज बारावीचा पहिला इंग्रजी या विषयाचा पेपर होता. मात्र पहिल्याच पेपरला त्रुटी आढळल्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. मात्र या त्रुटीवर संयुक्त सभेच्या अहवालानुसार योग्य तो विद्यार्थ्यांना न्याय दिला जाईल असे स्पष्टीकरण शिक्षण महामंडळाने दिले आहे. याबबत एक पत्रकच शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे.  

12 वी च्या पहिल्या लेखी परीक्षेतील पहिला पेपर इंग्रजीचा होता. या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत पान नंबर 10 वर प्रश्न क्रमांक 3 आणि त्यात उपप्रश्न होते ए 3, ए 4 आणि ए 5 हे प्रश्न सोडवत असताना विद्यार्थी थोडे गोंधळले. कारण, यामध्ये ए 3 आणि ए 5 मध्ये प्रश्नच दिलेला नव्हता. तर ए4 मध्ये कवितेच्या संदर्भातील प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि त्या खाली उत्तर सुद्धा देण्यात आले होते. त्यामुळे या तिन्ही प्रश्नांच्या संदर्भात विद्यार्थ्यामध्ये गोंधळ होता.

Honda Activa : नवीन प्रगत की लेस अॅक्टिवा एच स्मार्ट स्कूटर भारतात लाँच

या गोंधळावर उत्तर देताना बोर्डाने सांगितले आहे की, “फेब्रुवारी – मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी 2023 पासून आयोजित करण्यात आलेली आहे.

आज इंग्रजी विषयाची परीक्षा पार पडली. प्रचलित पद्धतीप्रमाणे इंग्रजी विषयाची संयुक्त सभा विषय तज्ज्ञ व सर्व विभागीय मंडळाचे प्रमुख नियामक यांच्या समवेत आयोजित करण्यात आली होती. तथापि शिक्षकांचा त्यांच्या धोरणात्मक मागण्यांबाबत बहिष्कार असल्यामुळे सदरची सभा (Board Exam) होऊ शकलेली नाही. इंग्रजी विषयात्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांमध्ये निदर्शनास आलेल्या त्रुटीबाबत मुख्य नियामकांची संयुक्त सभा पुन:श्च आयोजित करण्यात येवून इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील त्रुटीबाबत संयुक्त सभेचा अहवालानुसार विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय देण्यात येईल, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.