Maval News : श्री क्षेत्र कोंडेश्वर येथे भगवान शंकराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या जांभवली या गावात स्वयंभू पिंड आणि महादेवाचे मंदिर आहे. हे देवस्थान मावळ तालुक्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या महादेवाच्या मंदिरात दक्षिण बाजूजवळ प्रांगणामध्ये भगवान श्री शंकराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मावळचे माजी आमदार दिगंबर भेगडे व श्री पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर यांच्या हस्ते आणि पोलीस पाटील दत्तात्रय लालगुडे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला.

याप्रसंगी माजी आमदार दिगंबर भेगडे यांनी शुभेच्छा व्यक्त करत असताना स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळे आणि कागदपत्रांच्या पाठपुराव्यामुळे हे देवस्थान तीर्थशेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले आणि खऱ्या अर्थाने येथील विकास झाला असे प्रतिपादन केले.

श्री पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर व पोलीस पाटील दत्तात्रय लालगुडे यांनी सदर काम होणेसाठी विशेष प्रयत्न केले असल्याने, तेथील ग्रामस्थ माजी सरपंच भगवान पवार व हरिभाऊ कदम आणि राजू कदम यांनी ग्रामस्थांचे वतीने त्यांचे आभार मानले.

यावेळी संत तुकाराम साखर कारखान्याचे माजी संचालक माऊली शिंदे, मावळ भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर,अखिल भारतीय वारकरी मंडळाचे पुणे जिल्हा अध्यक्ष ह भ प सुखदेव महाराज ठाकर,तालुका अध्यक्ष दत्तात्रय महाराज शिंदे, माजी जि प सदस्य गुलाबराव वरघडे,चंद्रशेखर भोसले, माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण बालगुडे, गणपत सावंत आदींनी या स्तुत्य कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या

या प्रसंगी श्री पोटोबा देवस्थान विश्वस्त सचिव अनंता कुडे, विश्वस्त, सुभाष जाधव, किरण भिलारे, तुकाराम ढोरे, नारायण ढोरे,पंढरीनाथ भिलारे,अरविंद पिंगळे,बाळासाहेब कुडे,माजी ग्रा सदस्य भरत म्हाळसकर, उद्योजक राजु लालगुडे, रविंद्र हुंडारे, पत्रकार सुदेश गिरमे, नगरसेवक किरण म्हाळसकर,माजी सरपंच प्रकाश आगळमे,रविंद्र म्हाळसकर, रमेश ढोरे,वडगाव सोसायटी चे व्हाईसचेअरमन निलेश म्हाळसकर, संचालक ॲड अजित वहिले,सोमनाथ काळे, गणेश गवारे,संभाजी येवले आदीसह, पंचक्रोशीतील भाविक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वडगाव भाजपचे सरचिटणीस कल्पेश भोंडवे तर आभार अखिल भारतीय वारकरी मंडळाचे वडगाव गटाचे अध्यक्ष नारायण ढोरे यांनी मानले

सदर कार्यक्रमाचे नियोजन श्री पोटोबा देवस्थान, श्री कोंडेश्वर देवस्थान,श्री सत्संग भजनी मंडळ आणि अखिल भारतीय मंडळाचे सर्व प्रमुखांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.