Wakad : मेडिकल मधून गोळ्या औषधे घेऊन दाखवले बनावट ट्रांजेक्शन

एमपीसी न्यूज – मेडिकल मधून गोळ्या औषधे खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे देण्याचा बहाणा करत बनावट ट्रांजेक्शन दाखवत फसवणूक केली. तसेच आणखी एका दुकानदाराची अशाच पद्धतीने फसवणूक केली. हा प्रकार 19 एप्रिल रोजी ताथवडे चौक आणि दत्त मंदिर रोड वाकड (Wakad) येथे घडला.

Hinjawadi : मैत्रिणीच्या मोबाईल मधील डेटा चोरला; क्रेडीट कार्डद्वारे खरेदी केला महागडा मोबाईल

नरेश शेषाराम चौधरी (वय 29, रा. वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवराज भोसले मोबाईल क्रमांक 9307001645 आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे ताथवडे चौकात मेडिकल दुकान आहे. 19 एप्रिल रोजी आरोपी त्यांच्या दुकानात आले. त्यांनी तीन हजार 650 रुपयांचे गोळ्या औषधे आणि इतर वस्तूंची खरेदी केली. त्याचे पैसे देण्याचा बहाणा करून त्यांनी बनावट ट्रांजेक्शन दाखवून फिर्यादीला पैसे आल्याचे सांगितले.

त्यानंतर आरोपींनी दत्त मंदिर रोडवरील अनिलकुमार बगदाराम चौधरी यांच्या स्टेशनरी दुकानातून चार हजार 400 रुपयांचे सामान घेऊन त्यांनाही बनावट ट्रांजेक्शन दाखवून पैसे पाठवल्याचे सांगितले. मात्र फिर्यादी आणि चौधरी यांच्या बँक खात्यात पैसे आले नाहीत. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या दोघांना पुणे शहरातून पकडले. त्यांनी हे गुन्हे केल्याचे कबूल केले. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.