Hinjawadi : कामाच्या ठिकाणी छळ केल्याबाबत कर्मचारी महिलेची पोलिसात धाव

एमपीसी न्यूज – कामाच्या ठिकाणी दोन महिलांनी एका कर्मचारी महिलेचा छळ केला. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संबंध ठेवण्यासाठी धमकी दिली असल्याची तक्रार पिडीत कर्मचारी महिलेने हिंजवडी पोलिसात केली आहे.

Wakad : मेडिकल मधून गोळ्या औषधे घेऊन दाखवले बनावट ट्रांजेक्शन

हिंजवडी (Hinjawadi) येथील एका खासगी आस्थापनेत काम करणाऱ्या महिलेने याबाबत पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कंपनीमधील वरिष्ठांनी महिलेला दोन महिन्यांपासून त्रास दिला. याबाबत महिलेने मानव संसाधन (एचआर) विभागात तक्रार केली. त्यानंतर महिलेच्या पगाराचे पैसे अन्य व्यक्तीच्या खात्यात जमा केले. याबाबत विचारणा केली असता महिलेला कामावरून काढून टाकले.

घरात घुसून मारण्याची धमकी महिलेला तिच्या वरिष्ठांनी दिली. कंपनीत काम करणाऱ्या दोन महिलांनी तक्रारदार महिलेला कंपनीच्या सीईओ सोबत रिलेशन मध्ये राहण्यासाठी दबाव आणला. सीईओने देखील तक्रारदार महिलेला अश्लील हावभाव केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्रास देणाऱ्या दोन महिला तक्रारदार महिलेला त्यांच्या सीईओ सोबत लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहण्यास सांगत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याबाबत कंपनीच्या सीईओशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. संपर्क होताच त्यांची बाजू मांडली जाईल.

https://youtube.com/shorts/621fIMhLC8s?si=A6nRaHPnl0OPYRxa

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.