Pimple Saudagar : अॅबॅकस आणि वैदिक गणितामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा नाना काटे यांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर रोझलँड रेसिडेन्सी येथील रहिवाशी कविता पाटील या गणितामध्ये स्पेशलायझेशनसह एम.एस्सी.पदवीधर आहेत. त्या येथील विद्यार्थ्यांसाठी सन २०१० पासून पिंपळे सौदागर येथे अॅबॅकस आणि वैदिक गणित वर्ग घेत आहेत. त्यांनी अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार जिंकले आहेत. कविता पाटील या  गेल्या ६ वर्षांपासून सलग फ्रँचाइझी पुरस्कार जिंकत आहेत. दरवर्षीप्रमाणेच, या वर्षीही एक यशस्वी वर्ष होते, ज्यात त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांना विविध बक्षिसे जिंकता आले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा नाना काटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ५ ते १२ वयोगटातील हे विद्यार्थी आहेत.

१२ व्या महाराष्ट्र राज्य स्तरीय अॅबॅकस व वैदिक गणित या परीक्षेत ३७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यापैकी प्रथम क्रमांकाचे बक्षिस १६ विद्यार्थी, द्वितीय क्रमांकाचे ६ विद्यार्थी, तृतीय क्रमांकाचे ६ विद्यार्थी, चतुर्थ क्रमांकचे ५ विद्यार्थी, पाचव्या क्रमांकाचे ५ विद्यार्थ्यांनी बक्षिसे पटकावली. तर अॅबॅकस आंतरराष्ट्रीय श्रेणी परिक्षेत ४० विद्यार्थ्यांनी भाग घेतला व बक्षिसे मिळविली.

यशस्वी विद्यार्थ्यांचे नाव :-

प्रथम क्रमांक :- शर्वरी चव्हाण, श्रावणी भोसले,शाश्वत यादव,अशिता खंडेलवाल, पार्थ पाटील,रीशा शानबाग,आयुष पटनी,तनिष्का शर्मा,जैनील शाह, अथर्व सोमनाचे, गीत रावलानी, रुद्र पाटील, माही मेहता, आयुष कुमार, अमृता दोडला, अदिती जोशी.

द्वितीय क्रमांक :- तुविजत चोपडे, नील फेगडे, मल्हार जगताप, तन्वी सूर्यवंशी, आयुष पाठक, अन्वेषा जैन.

तृतीय क्रमांक :- यशश्री पाटील, जयदीप सहा, मान्या जैन, श्रीशा कोठावदे, सयुंक्ता पानसरे, वैष्णवी सोनवणे.

चतुर्थ क्रमांक :- अदिती अराली, पी.नील ईशान,विहान गन्धम, सारांश सावल.

पाचवा क्रमांक :- अन्विक विश्वकर्मा, स्वरा बस्तवडे, सानिका मज्जागी, अयान गंजू, आरव आचारी.

अॅबॅकस आंतरराष्ट्रीय श्रेणी

उत्कृष्ट श्रेणी :- शर्विल देशमुख, आराध्य चिंतालवर, हर्षित गोडबोले, हिमायू चौधरी, उत्कर्ष सरडे, आर्यन शिंदे, रीयांश वर्मा, अन्वेषा जैन, आयुष नायक, पार्थ पाटील, परी वसईकर, स्वरा बस्तावाडे, सानिका मज्जागी, आरोही मुले, अद्वैत भोसले, शर्वरी दादासो, शाश्वत यादव, तनिष्का शर्मा.

विशेष श्रेणी :- श्रीशा कोठावदे, नील फेगडे, श्रावणी भोसले, मल्हार जगताप, अर्चित कोठावदे, अन्विक विश्वकर्मा, पी.नील ईशान, जयदीप साहा.

मेरीट :- आयुष पटनी, ग्रीष्मा पाटील, श्रीनिधी.

या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक नाना काटे व रोझलँड रेसिडेन्सीचे चेअरमन संतोष मसकर यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, पालक व रोझलँड रेसिडेन्सीचे सभासद चंदन चौरसिया, प्रशांत पाटील, लेवा पाटीदारचे अध्यक्ष पुरुषोत्तम पिंपळे तसेच रोझलँड रेसिडेन्सी मधील रहिवाशी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देवून कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.