Navi Sangvi : संगीता जोगदंड यांना हिरकणी पुरस्कार 

एमपीसी न्यूज –  नवी सांगवी येथील सामाजिक कार्यकर्त्या संगिता जोगदंड यांना जळगाव येथील “सेवक सेवाभावी”संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यासाठी हिरकणी पुरस्कार    देऊन गौरविण्यात आले. 

_MPC_DIR_MPU_II

जळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील ,महापौर सिमा भोळे, संस्थेचे अध्यक्ष विशाल शर्मा, यांच्या हस्ते देण्यात आला.    राज्यभरातुन  क्रिडा,पत्रकारिता, आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक साहीत्य, ईत्यादी क्षेत्रात स्वःबळावर उल्लेखनीय  सामाजिक कार्याचा ठसा उमटणाऱ्या कर्तृत्ववान महिलाचा जळगावातील ,”कांताबाई” सभागृहात पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला.आयुक्त चंद्रकांत डांगे, माजी आयुक्त.राजु भोळे, जिल्हा परिषद अध्यक्ष उज्वला पाटील, ,मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष  अण्णा जोगदंड अस्मिता वाघ,”बेटी बचाव बेटी पढावचे ब्रँड अँबेसिटर अस्मिता पाटील सेवक सेवाभावी संस्थेचे संतोष धिवरे,रंजना शर्मा, पंकज शर्मा,,सामाजिक कार्यकर्त्या .राखी रासकर,बहुभाषिक ब्राह्मण संघाचे संस्थापक श्रीकांत खटोड,बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष संजय व्यास आदी उपस्थित होते.

यावेळी  पुरस्काराला उत्तर देताना  जोगदंड म्हणाल्या, आपल्याला समाजाचे काहीतरी देणं आहे. आणि ते आपण दिलं पाहीजे या मानवतेच्या दृष्टिकोनातुन मी हे काम करत असते .आणि माझे पती  अण्णा जोगदंड हे ही एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यामूळे हा सामाजिक कार्याचा वारसा मला माझ्या कुटुंबातुनच मिळाला आहे.त्यामुळे मी हे सामाजिक काम करू शकले.आणि या संस्थेच्या पदाधिकारी यांनी जो माझ्या सामाजिक कार्यावर  विश्वास दाखवून माझी निवड केली तो मी विश्वास सार्थ ठरवेन आधिक जोमाने  सामजहितासाठी काम करीत राहील.   कार्यक्रमामध्ये काही निवडक कवयीत्रिने  ऐरणी   भाषेत कविता सादर केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.