Talegaon : सरस्वती शाळेत वार्षिक क्रीडा बक्षीस समारंभ उत्साहात

एमपीसी न्यूज – तळेगाव येथील सरस्वती विद्या मंदिर या शाळेत इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक बक्षीस समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष सुरेश झेंड तर प्रमुख पाहुणे म्हणून संदीप कुडे, अभय लिमये गुरुजी उपस्थित होते.

आपल्या प्रास्ताविकात मुख्याध्यापिका परदेशी बाईंनी वर्षंभर राबविण्यात आलेल्या शालांतर्गत सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेचा आढावा घेतला. मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा मैदानी खेळ खेळण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कुलांतर्गत झालेल्या स्पर्धेमध्ये राजगड कुलाने प्रथम क्रमांक मिळवला. ती ट्रॉफी कुलप्रमुख शिक्षक सुरेखा रासकर व विद्यार्थी कुलप्रमुख यांनी स्वीकारली.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये सन 2019-20 साठीचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार गणेश देशपांडे यांना मिळाला. संदीप कुडे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व 10 वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. अभय लिमये व सुरेश झेंड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 5 वी ते 7 वी चे पर्यवेक्षक नितिन शिंदे सर व माध्यमिक विभागाचे पीटी शिक्षक संजय गायकवाड यांनी केले. बक्षीस पात्र विद्यार्थ्याची नावे वर्गशिक्षकांनी वाचली. आभार माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सुरेखा रासकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. बालवाडी विभाग प्रमुख सोनाली काशीद उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.