Pimpri : महापालिकेतील शाळा दिल्लीतील सरकारी शाळेसारख्या विकसित करा -आप युवा आघाडी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शाळा दिल्लीतील सरकारी शाळेसारख्या विकसित करा, अशी मागणी आप युवा आघाडी यांनी आज अतिरिक्त आयुक्तांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.

ऑक्टोबर २०१८ मध्ये अभ्यास दौऱ्याच्या अंतर्गत पिंपरी-चिंचवडमधील नगरसेवक, महापौर तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्ली येथे भेट देऊन तेथील शाळांची पाहणी केली होती. त्यानंतर महापौरांनी पीसीएमसीमधील महापालिकेच्या शाळांच्या सुधारणेसठी आवश्यक उपाय योजनांची घोषणा करत त्वरित अमलबजावणीचे आदेश देखील दिले होते.

आप पिंपरी-चिंचवड युवा आघाडीतर्फे या विषयसंदर्भात महापालिकेने केलेल्या कामांची माहिती तसेच आजपर्यंतची प्रगती जाणून घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची भेट घेतली.

सोबतच आपतर्फे आम्ही महापालिकेच्या या उपक्रमाचे स्वागत करतो. तसेच आमच्याद्वारे आप दिल्ली सोबत समन्वय साधत शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी जी काही मदत गरजेची असेल ती करण्यास आम्ही उत्सुक असून महापालिका प्रशासना सोबत या क्षेत्रात काम करण्यास आमचा सक्रिय सहभाग असेल.

यावेळेस युवा आघाडीचे अध्यक्ष चेतन बेंद्रे, रणधीर नायडू, धर्यशिल लोखंडे, प्रदनेश शितोळे, आशुतोष शेळके, हस्मित उचील, रितेश भामरे, राज चाकणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.