Pune : फेक कॉल व मेल आयडी वापरून व्यापा-याच्या 11.5 लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकाला सुरत येथून अटक

आर्थिक व सायबर गुन्हे विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज – फेक कॉल व मेल आयडी बनवून त्याद्वारे औंध येथील व्यापा-याला संपर्क करून त्याची साडेअकरा लाखांना फसवणूक केल्या प्रकरणी एका तरुणाला सुरत येथून अटक करण्यात आली. पुण्याच्या आर्थिक व सायबर गुन्हे विभागाने ही कारवाई केली. याप्रकरणी अशोक भाऊ पाटील आंधळे (वय 54, व्यवसाय रा. औंध, पुणे), यांनी फिर्याद दिली.

राहुल मनसुखलाल बाघेला (रा. वासाना अहमदाबाद,), असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशोक आंधळे हे व्यापारी आहे. आरोपी राहुल याने अशोक यांना फोन करून आपण लक्ष्मी इंटरप्रायझेस मधून बोलत असल्याचे भासवले. तसेच [email protected]  या फेक मेल आयडीवरून संवाद साधला. त्याचप्रमाणे त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी डेटेड चेक पाठविले. त्यानंतर फिर्यादी अशोक यांच्याकडून 11 लाख 55 हजार रुपयांचे 5 किलो इराणी केसर घेऊन त्या बदल्यात त्यांना एकही पैसा दिला नाही. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अशोक यांनी पुणे सायबर विभागाला 9998814100, 9913292924 व [email protected]  या वापरकर्त्याविरोधात फिर्याद दिली.

त्यानुसार सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करीत गुजरात येथील अहमदाबाद व सुरत येथून गुन्हा घडल्याचे समोर आले. त्यानुसार आरोपी राहुल याला अहमदाबाद गुजरात येथे जाऊन शोध घेतला. त्यानंतर आरोपी सुरत येथे असल्याचे समजताच त्याला सुरत येथून ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. चौकशीत आरोपी राहुल याने गुन्हा केल्याचा कबुली जवाब दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.