Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथील सरस्वती विद्या मंदिर चे क्रीडा स्पर्धेत सुयश

एमपीसी न्यूज :  नुकत्याच झालेल्या मावळ तालुका व जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेमध्ये सरस्वती विद्यामंदिर तळेगाव दाभाडे येथील माध्यमिक विभागातील (Talegaon Dabhade) विद्यार्थ्यांनी सुयश मिळवलेले आहे. कुमारी रुजुला जगदाळे इयत्ता नववी एक या विद्यार्थिनीने तालुकास्तरीय  बुद्धिबळ स्पर्धेमध्ये चौथा क्रमांक प्राप्त केला असून जिल्हास्तरावर तिचा अकरावा क्रमांक आलेला आहे.

.त्याचप्रमाणे  जानव्ही वाळेकर इयत्ता आठवी एक मधील विद्यार्थिनीने शंभर मीटर धावणे मध्ये चौथा क्रमांक प्राप्त केलेला आहे. कुमारी यशदा हेंद्रे या इयत्ता आठवी एक मधील विद्यार्थिनीने कराटे स्पर्धेमध्ये तालुकास्तरावर रौप्य पदक मिळवलेले असून गुरुग्राम तर्फे दिल्ली येथे झालेल्या कराटे स्पर्धेमध्ये कराटेच्या विविध प्रकारात तिला ब्राझ व सुवर्णपदक प्राप्त झालेले आहे.

त्याचप्रमाणे थाळीफेक स्पर्धेमध्ये इयत्ता दहावी दोन मधील रुद्र गायकर या विद्यार्थ्यांचा तिसरा क्रमांक आला असून दहावी एक मधील अमन शेख या विद्यार्थ्यास चौथा क्रमांक प्राप्त झालेला आहे. कुंफू स्पर्धेमध्ये इयत्ता आठवी एक मधील सर्वेश पेठकर याने सुरत येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक व ब्रांझपदक मिळवलेले आहे .

Pune News : आजपासून रंगणार सवाई गंधर्व महोत्सव

विद्यार्थ्यांच्या या सुयशाबद्दल सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश झेंड ,उपाध्यक्ष श्री दिलीप कुलकर्णी ,अंमलबजावणी अधिकारी श्री अनंत भोपळे, कार्यवाह श्री प्रमोद देशक ,खजिनदार  सौ सुचित्रा चौधरी, शिक्षण मंडळ सदस्य डॉक्टर ज्योती चोळकर, सदस्य  श्री विश्वास देशपांडे, (Talegaon-Dabhade)  सुनिल आगळे ,मुख्याध्यापिका सौ  रेखा परदेशी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री नवनाथ गाढवे, पर्यवेक्षिका सौ सुरेखा  रासकर व क्रीडा शिक्षक श्री संजय गायकवाड ,सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.