Pune News : आजपासून रंगणार सवाई गंधर्व महोत्सव

एमपीसी न्यूज : संगीतप्रेमी पुणेकरांसाठी पर्वणी असलेल्या सवाई गंधर्व महोत्सवाला आजपासून सुरुवात होणार आहे. या महोत्सवासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. (Pune News) 68 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील चार दिवस पुणेकरांना संगीताची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. मुकुंदनगर येथील महाराष्ट्र मंडळाच्या क्रीडासंकुलात हा महोत्सव पार पडणार आहे. 

आज (14 डिसेंबर) दुपारी 4 वाजता सवाईच्या सांगीतिक स्वरयज्ञाला किराणा घराण्याचे जेष्ठ गायक पंडित उपेंद्र भट यांच्या गायनाने सुरुवात होणार आहे. त्यानंतर शाश्वती मंडल आणि रतनमोहन शर्मा यांचे गायन होईल. पहिल्या दिवशीची सांगता उस्ताद अमजद अली खान यांच्या सरोद वादनाने होणार आहे. 14 ते 18 डिसेंबर दरम्यान हा महोत्सव रंगणार असून कार्यक्रम स्थळी सुमारे 7 ते 8 हजार संगीत रसिकांना सामावून घेणाऱ्या भव्य दिव्य अशा मांडवाची उभारणी करण्यात आली आहे.

Today’s Horoscope 14 December 2022- जाणून घ्या आजचे राशिभविष्य

यावर्षीच्या महोत्सवात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी साजरी होत असल्याने एक वेगळीच झळाळी महोत्सवाला लाभणार आहे. याचाच एक भाग म्हणून जुन्या जमान्यातील नामवंत प्रकाशचित्रकार वा. ना. भट यांनी पं. भीमसेनजींच्या तरुणपणी काढलेले तब्बल 18 फूट उंचीचे व्यक्तीचित्र रसिकांना पहायला मिळणार आहे.

महोत्सवासाठी येणाऱ्या  रसिकांच्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांसाठी सुसज्ज पार्किंग, कार्यक्रमाचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना घेता यावा यासाठी नेहमीप्रमाणे मोठ्या एलईडी स्क्रीन्स, अल्पोपहाराची सोय असणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आदी सुविधा महोत्सवाच्या ठिकाणी असणार आहेत. शिवाय मंडपाच्या एका बाजूस संगीत क्षेत्राशी संबंधित विविध उत्पादनांचे तर एका बाजूला प्रायोजकांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. पुरुष आणि महिलांसाठी प्रसाधनगृह मंडपाच्या मागील बाजूस उभारण्यात आले आहेत.

पीएमपीएमएलतर्फे विशेष बससेवा

या महोत्सवासाठी पीएमपीएमएल तर्फे विशेष सेवा देण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांचा प्रवासदेखील सोपा होणार आहे. शिवाय कार्यक्रम संपल्यानंतर पीएमपीएमएल तर्फे विशेष बससेवा संगीत रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून पुण्यातील रिक्षा संघटनांतर्फे देखील रसिकांना अपेक्षित स्थळी पोहोचविण्यासाठी मदत देणार येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.