Today’s Horoscope 14 December 2022- जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 14 December 2022- जाणून घ्या आजचे राशिभविष्य

वार – बुधवार.

14-12-2022

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – मघा.

चंद्र राशी – सिंह.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- सोनेरी )

आज तुम्ही आपल्याच मनाप्रमाणे वागाल. तरुण वर्गात चैनी व विलासी वृत्ती बळावेल. थोडी अहंकाराची बाधा होऊ शकते. नवोदित कलाकार मिळालेल्या संधीचे सोने करतील.

वृषभ (शुभ रंग- राखाडी )

गृहणी आज घराची शोभा वाढवण्यासाठी पैसा खर्च करतील. कलाकारांना स्ट्रगल वाढवावी लागणार आहे. प्रेमी युगुलानी तर आज मौनव्रत ठेवणेच हिताचे राहील.

मिथुन ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

वास्तु व वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार आज टाळलेत तर बरे होईल.  विद्यार्थी आज अभ्यासापेक्षा खेळातच रमतील. वाहन रस्त्यात नादुरुस्त होण्याची शक्यता आहे.

कर्क (शुभ रंग- पिस्ता)

आज तुम्हाला एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. आज तुम्ही गोड बोलून विरोधकांनाही आपलेसे कराल. दुरावलेले मित्रमंडळी आज जवळ येतील.

सिंह (शुभ रंग- निळा )

आपल्या कार्यक्षेत्रात इतरांस अशक्य ते शक्य करून दाखवण्याची तुमची आज जिद्द असेल. विरोधकांनाही तुमची मते आज पटवून द्याल. ज्येष्ठांनी प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

कन्या ( शुभ रंग- चंदेरी )

घरातील थोर मंडळींशी काही वैचारिक मतभेद होतील. त्यांच्या वयाच्या मान राखावा लागेल. आज एखादा अनपेक्षित खर्च उद्भवेल जो टाळता येणार नाही. आज वाद मात्र टाळा.

Pimpri-Chinchwad University : पिंपरी-चिंचवड विद्यापीठाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

तूळ ( शुभ रंग- पांढरा )

कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज थोडी अनावश्यक खरेदी ही कराल. आज मित्रमंडळीत तुमच्या शब्दाला मान राहील.

वृश्चिक (शुभ रंग- क्रीम)

आज तुम्ही आळस झटकून कामाला लागाल. पण अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल. मित्र आज चुकीचे सल्ले देतील. वडीलधाऱ्यांच्या शब्दाला मान देणे हिताचे आहे.

धनु- (शुभ रंग- गुलाबी)

कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आपल्याच काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागणार आहे. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांस दैव अनुकूल राहील.

मकर ( शुभ रंग- आकाशी )

कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्या चुका काढण्यासाठी टपून बसलेले आहेत. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची घाई करूच नका. आज झटपट लाभाचा मोह ही टाळायला हवा.

कुंभ (शुभ रंग – भगवा )

केवळ भिडस्तपणा पायी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. आज तुम्हाला थोडी विश्रांतीची गरज आहे. जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न कराल.

मीन -(शुभ रंग – मोरपंखी )

आज तुम्हाला काही आरोग्याच्या तक्रारी त्रस्त करतील. फार काळजी करू नका पण वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी थोडे नमतेच घेणे उत्तम.

 

 

   श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.