Crime News : 18.24 लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त, दोन जणांना अटक, राजगड पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज : राजगड पोलिसांनी 18.24 लाख रुपये किंमतीचा गुटखा, तीन वाहने असा एकूण 30 लाखांचा माल जप्त केला आहे. (Crime News) अशी माहिती राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे.

याप्रकरणाचा तपास सहाय्य्क पोलीस निरीक्षक मनोज नवसरे करीत आहेत. त्यांनी सांगितले की, या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आले आहे. त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले असता उद्या पर्यंतची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.

Pimpri-Chinchwad University : पिंपरी-चिंचवड विद्यापीठाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

पुणे- सातारा महामार्गवरील वेळु गावाच्या हद्दीत गुटखा घेऊन जाणाऱ्या वाहनाला पुणे शहरातील नागरिकांच्या मदतीने पकडण्यात आले आहे.(Crime News) एका ट्रक मधून अवैधरित्या आणलेला गुटखा दोन टेम्पो मध्ये भरत होते. त्यावेळेस तेथे राजगड पोलिसांचे पथक पोहोचले. या कारवाईत पोलिसांनी 18.24 लाख रुपये किंमतीचा गुटखा, एक ट्रक व दोन छोटे टेम्पो असा माल जप्त केला आहे.

अन्वर शरफुद्दीन शेख वय 35 वर्शे रा. सर्वे नं.54 जी पी 539 लोहीयानगर भौरी चाळ गंजपेठ पुणे, 2) शेरा रमजान खान वय 30 वर्शे रा. खातेगाव वॉर्ड 8 चुना भटटी ईदगाह मोहल्ला ता.खातेगाव जि.देवास राज्य मध्यप्रदेश, 3) रफीक शेख रा. संतोशनगर कात्रज पुणे, 4)मयुर अग्रवाल रा. पुणे अशी आरोपींची नावे असून यांच्या विरोधात भा. द. वि. कलम 328, 188,269,273 अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 व त्याअंतर्गत नियम व नियमाचे 2011 कलम 26(2)(i),26(2)(vi), 27 (3) (d), 27 (3) (e), 59 (iii), सह साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम सन 1897 चे कलम 2,3,4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवार 12 डिसेंबर 2022 रोजी रोजी सकाळी 09.00 वा चे सुमारास मौजे शिंदेवाडी, ता. भोर, जि.पुणे येथे पुणे सातारा रोडलगत विल्सन कंपनीकडे जाणाऱ्या रोडवर पद्मावती मेटल कॉर्पोरेशन कंपनीच्या समोर सर्विस रोडवर अन्दर शरफुद्दीन शेख वय 35 वर्ष,  शेरा रमजान खान वय 30 वर्ष, रफीक शेख रा. संतोशनगर कात्रज पुणे, मयुर अग्रवाल रा. पुणे यांनी वरील वर्णनाचा सुगंधी तंबाखु व पान मसाला व वाहनांसह एकूण 31,74,000/- रुपये किंमतीचा प्रतिबंधीत माल जप्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.