Pune : ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात यांचे निधन

एमपीसी न्यूज – चिंतन ग्रुपचे संस्थापक, जेष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात (वय वर्ष ६५) यांचे आज दिनांक १५ फेब्रुवारी रोजी पुणे येथे आजारपणामुळे निधन झाले.

त्यांचे पार्थिव रविवारी (दि. १६) फेब्रुवारी सकाळी ८ ते १० या वेळेत त्यांच्या राहत्या घरी (शिवसृष्टी अपार्टमेंट, शिवाजी हौसिंग सोसायटी, सेनापती बापट रोड, पुणे) येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे व अंत्यविधी सकाळी ११.०० वाजता वैकुंठ स्मशानभूमी, पुणे येथे होईल.

त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी कांचन, दोन मुले मंदार, चिंतन, स्नुषा स्वाती, जान्हवी, नात इंद्रायणी, तीन भाऊ अशोक, स्वागत, निर्मलचंद्र व चिंतन ग्रुप असा मोठा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.